मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prabhas: 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करतोय सुपरस्टार प्रभास?

Prabhas: 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करतोय सुपरस्टार प्रभास?

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 18, 2022, 09:21 AM IST

    • kriti senon: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास कुणाला डेट करत आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
प्रभास (HT)

kriti senon: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास कुणाला डेट करत आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

    • kriti senon: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास कुणाला डेट करत आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

बाहुबली फेम प्रभास आपल्या सुपरहिट चित्रपटांबरोबरच अभिनेत्रींसोबतच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत असतो. तो कुणाला डेट करत आहे? तो कोणत्या अभिनेत्रीसोबत फिरतोय हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आता प्रभास एक बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Kshitij Zarapkar Passed Away: मराठी अभिनेते क्षितिज झारापकर यांचं निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी

कपिलच्या शोमध्ये सनी असं काय म्हणाला की बॉबी देओलच्या डोळ्यात आलं पाणी? Viral video बघाच

अमृता खानविलकर नवरा हिमांशूसोबत फोटो का नाही शेअर करत? स्वतःच कारण सांगताना म्हणाली...

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

काही दिवसांपूर्वी प्रभास अभिनेत्री अनुष्का शेट्टीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ते दोघे लग्न बंधनात अडकणार असल्याचे देखील म्हटले जात होते. पण आता प्रभासला एक बॉलिवूड अभिनेत्री आवडत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या अभिनेत्रीचे नाव क्रिती सेनॉन असे आहे. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे म्हटले जात आहे.
वाचा: स्पर्धकाने ५० लाख रुपयांच्या प्रश्नाला सोडला खेळ, तुम्ही देऊ शकाल उत्तर?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभास आणि क्रिती यांच्या मनात एकमेकांविषयी भावना आहेत. 'आदिपुरुष' चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली आहे. पहिल्या दिवसापासून ते एकमेकांच्या क्लोज आहेत. त्यांचा बाँड पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. कारण प्रभाज लाजाळू आहे. तो लवकर कुणाशी बोलत नाही. पण त्या दोघांचे बोलणे, फिरणे पाहून ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

प्रभास आणि क्रिती लवकरच 'आदिपुरुष' या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतने केले आहे. हा एक बिग बजेट चित्रपट आहे. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाचे चित्रीकरण लांबणीवर गेले. हिंदी बरोबरच तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

विभाग