मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pooja Sawant Birthday: डान्स शोमधून केली करिअरची सुरुवात; आता मनोरंजन विश्व गाजवतेय पूजा सावंत!

Pooja Sawant Birthday: डान्स शोमधून केली करिअरची सुरुवात; आता मनोरंजन विश्व गाजवतेय पूजा सावंत!

Jan 25, 2023, 07:29 AM IST

    • Happy Birthday Pooja Sawant: मराठी मनोरंजन विश्वातील बहुचर्चित अभिनेत्रींपैकी एक असलेल्या पूजा सावंत हिचा आज (२५ जानेवारी) वाढदिवस.
Pooja Sawant

Happy Birthday Pooja Sawant: मराठी मनोरंजन विश्वातील बहुचर्चित अभिनेत्रींपैकी एक असलेल्या पूजा सावंत हिचा आज (२५ जानेवारी) वाढदिवस.

    • Happy Birthday Pooja Sawant: मराठी मनोरंजन विश्वातील बहुचर्चित अभिनेत्रींपैकी एक असलेल्या पूजा सावंत हिचा आज (२५ जानेवारी) वाढदिवस.

Happy Birthday Pooja Sawant: मराठी मनोरंजन विश्वातील बहुचर्चित अभिनेत्रींपैकी एक असलेल्या पूजा सावंत हिचा आज (२५ जानेवारी) वाढदिवस. केवळ मराठी चित्रपटच नव्हे, तर तिने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. बालपणापासूनच नृत्याची आवड असणाऱ्या पूजाने डान्स शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हळूहळू ती नाटक, मालिका आणि चित्रपटांकडे वळली. तिच्या या प्रवासात तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अभिरामला तयार करण्यासाठी लीला दुर्गाची मदत घेणार! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?

सावनीमुळे मोडला मिहिर आणि मिहिकाचा साखरपुडा, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आजच्या भागात काय घडणार?

सायली देणार अर्जुनवरच्या प्रेमाची कबुली; प्रियाचा प्लॅन फसणार? ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार नवा टर्न!

गौरव मोरेने सोडला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम, काय आहे कारण? जाणून घ्या

अभिनेत्री पूजा सावंत हिचा जन्म २५ जानेवारी १९९०ला झाला. पूजाला अभिनयाचं बाळकडू तिच्या घरातूनच मिळालं आहे. पूजाचे वडील विलास सावंत यांनी वयाची देखील अभिनय क्षेत्रात काम केले आहे. पूजाच्या वडिलांनी अनेक दमदार मराठी नाटकांमधून काम केले आहे. वडिलांकडूनच आपल्याला अभिनयाचा वारसा मिळाला, असे पूजा नेहमी सांगते. शाळेत असल्यापासूनच पूजाला नृत्याची खूप आवड होती. शाळेत पार पडणाऱ्या प्रत्येक डान्स कार्यक्रमात ती आवर्जून भाग घ्यायची. शालेय जीवनात तिने अनेक नाटकं आणि डान्स कार्यक्रमात भाग घेत बक्षीसं पटकावली होती. दरम्यान तिने एका डान्स शोमध्ये देखील भाग घेतला होता. इथून तिच्या करिअरची सुरुवात झाली होती.

२००८मध्ये पूजा सावंत हिने ‘श्रावण क्विन’ या स्पर्धेत भाग घेतला होता. दमदार अभिनय आणि बहारदार नृत्यकौशल्याने तिने हि स्पर्धा जिंकली. त्यावेळी या स्पर्धेच्या परीक्षक पदाची धुरा अभिनेता-दिग्दर्शक सचित पाटील सांभाळत होता. पूजाचा अभिनय पाहून सचितने तिला ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातील एका भूमिकेसाठी विचारणा केली. पूजानेही या चित्रपटासाठी लगेच होकार कळवला. या चित्रपटातून तिने मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केले.

यानंतर पूजाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘सांगतो ऐका’, ‘नीलकंठ मास्तर’, ‘पोस्टर बॉईज’, ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’ असे अनेक दमदार चित्रपट तिने केले आहेत. मराठीत आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर आता पूजा बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय झाली आहे. ‘जंगली’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. या चित्रपटात ती अभिनेता विद्युत जामवालसोबत मुख्य भूमिकेत झळकली आहे.

विभाग