मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pooja Sawant: वैभव तत्त्ववादी की भूषण प्रधान? अफेअरच्या चर्चांवर पूजा सावंतचे वक्तव्य, लिहिली पोस्ट

Pooja Sawant: वैभव तत्त्ववादी की भूषण प्रधान? अफेअरच्या चर्चांवर पूजा सावंतचे वक्तव्य, लिहिली पोस्ट

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 26, 2022 11:49 AM IST

Pooja Sawant Post: पूजा सावंतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

पूजा सावंत
पूजा सावंत (HT)

मराठी चित्रपसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून पूजा सावंत ओळखली जाते. ती कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी पूजाचा 'दगडी चाळ' हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर तिचा एक म्यूझिक व्हिडीओ प्रदर्शित झाला. या गाण्यात ती वैभव तत्त्ववादीसोबत दिसली होती. त्यापाठोपाठ तिची भूषण प्रधानसोबत एक जाहिरात आली. या सगळ्यादरम्यान, पूजा सावंतच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

पूजाने 'चल अब वहॉं' या गाण्याच्या प्रमोशनसाठी रोमँटिक फोटोशूट केले होते. ते पाहून अनेकांनी ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत असे म्हटले होते. एका यूजरने तर कमेंट करत यंदा कर्तव्य आहे अशी कमेंट केली आहे. त्यानंतर भूषण प्रधानसोबत जाहिरात केल्यानंतर ती भूषणसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. आता या सर्व चर्चांवर पूजाने वक्तव्य केले आहे.
वाचा: 'सैराट'नंतर नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर पुन्हा एकत्र, दिसणार ‘या’ चित्रपटात

पूजाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने वैभव आणि भूषण यांच्याविषयी लिहिले आहे. तसेच तिने पोस्टमध्ये त्या दोघांसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

पूजाने फोटो शेअर करत, “ही काही मैत्रीदिनाची पोस्ट नाही. पण खऱ्या मित्रासारखे तुम्ही दोघंही माझ्या पाठिशी खंबीर उभे राहिलात त्यासाठी धन्यवाद. आपण एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतो. यादरम्यान अनेक चढ-उतार आले. काही चांगल्या तर काही वाईट आठवणीही आहेत. काहीही झाले तरी एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार हे आपल्याला माहित आहे. तुमच्या दोघांबरोबरही स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली त्याबाबत मी स्वतःला भाग्यवान समजते. हे आतापर्यंतचे सगळ्यात बेस्ट दिवाळी गिफ्ट आहे” असे कॅप्शन दिले आहे.

एकंदरीत पूजाची ही पोस्ट पाहाता ती वैभव किंवा भूषण या दोघांपैकी कुणालाच डेट करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता पूजा कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

IPL_Entry_Point

विभाग