मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Oscar Award 2023 nomination : RRR ने रचला इतिहास! 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन
'नाटू नाटू' गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन
'नाटू नाटू' गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन

Oscar Award 2023 nomination : RRR ने रचला इतिहास! 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन

24 January 2023, 21:52 ISTShrikant Ashok Londhe

RRR naatu naatu nominated : गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावल्यानंतर आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याने ऑस्करमध्ये डंका वाजवला आहे. या गाण्याला ओरिजनल साँग कॅटेगरीसाठी नॉमिनेशन मिळाले आहे.

आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याने पुन्हा एकदा धमाका केला आहे. नाटू नाटू गाण्याला ऑस्कर नॉमिनेशनमध्ये स्थान मिळाले आहे. या गाण्याला ओरिजनल साँग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळाले आहे. मंगळवारी ९५ व्या एकॅडमी अवॉर्ड्सच्या नामांकनाची घोषणा करण्यात आली. या गाण्याला एमएम किरवानी यांनी संगीतबद्ध केले आहे. एसएस राजामौली यांच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटाने ऑस्कर अवॉर्डमध्ये इतिहास रचला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एलिसन विलियम्स आणि रिज अहमद यांनी नॉमिनेशनची घोषणा केली. यापूर्वी नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजनल साँगचा गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

 

सांगितले जात आहे की, 'नाटू नाटू' गाण्याने लेडी गागाआणि री- री यांच्या गाण्याला मागे टाकले आहे. समर्थक आशा करत आहेत की, पुन्हा एकदा'नाटू नाटू'आंतरराष्ट्रीय पुरस्कार घेऊन यावे. ऑस्कर अवॉर्ड्स २०२३ नॉमिनेशन्स, बवर्ली हिल्स, कॅलिफोर्नियामध्ये झाले.

 

'नाटू नाटू' गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन
'नाटू नाटू' गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन

या दोनडॉक्यूमेंट्रीचित्रपटांनीही मारली बाजी -
याचबरोबर शॉनक सेन यांची डॉक्यूमेंट्री फीचर फिल्म All That Breathes ही यावेळीऑस्कर अवॉर्ड्स २०२३ मध्ये नॉमिनेट झाली आहे. इतकेच नाही तर दिग्दर्शक गुनीत मोंगी यांची The Elephant Whisperers डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्मसाठी नॉमिनेट झाली आहे. आजचा दिवस भारतीय चित्रपट उद्योगासाठी अभिमानाचा दिवस होता.

 

Oscar award
Oscar award

देशातील तीन चित्रपट ऑस्कर जिंकण्याच्या रेसमध्ये सामील आहेत. दरम्यान भारताकडून ऑफिशियल एंट्री'छेलो शो' (द लास्ट फिल्म शो) टॉप१५ मध्ये शॉर्टलिस्ट झाली होती मात्र हा चित्रपट कोणत्याच कॅटेगरीचा हिस्सा बनला नाही.

 

विभाग