मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gauri Khan FIR: गौरी खान विरोधात लखनऊमध्ये गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Gauri Khan FIR: गौरी खान विरोधात लखनऊमध्ये गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 02, 2023, 03:15 PM IST

  • Gauri Khan: मुंबईतील एका उद्योगपतीने गौरी खान आणि आणखी तीन लोकांविरोधात उत्तर प्रदेशमध्ये तक्रार दाखल केली आहे.

गौरी खान (PTI)

Gauri Khan: मुंबईतील एका उद्योगपतीने गौरी खान आणि आणखी तीन लोकांविरोधात उत्तर प्रदेशमध्ये तक्रार दाखल केली आहे.

  • Gauri Khan: मुंबईतील एका उद्योगपतीने गौरी खान आणि आणखी तीन लोकांविरोधात उत्तर प्रदेशमध्ये तक्रार दाखल केली आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या 'पठाण' या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे तर दुसरीकडे त्याची पत्नी गौरी खान विरोधात उत्तर प्रदेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरीसोबत तीन लोकांविरोधात लखनऊ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बायकोचं सामान उचलून कुशल बद्रिके निघाला फिरायला, मजेशीर फोटो शेअर करत म्हणाला...

लंडनमध्ये राधिका मर्चंट- अनंत अंबानीसाठी पाकिस्तानी गायक अतिफ असलमने गायले गाणे, फोटो व्हायरल

Actor Sahil Khan arrested: महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान याला अटक

पूर्व पत्नी रीना दत्ता हिने आमिर खान याच्या लगावली होती कानशि‍लात, काय होते कारण?

गौरी ही तुलस्यानी कंस्ट्रक्शन अँड डेवलपर्स लिमिटेडची ब्राँड अॅम्बेसेडर आहे. मुंबईत राहणाऱ्या किरीट जसवंत शाह नावाच्या एका व्यक्तीने यांच्या लखनऊ येथील प्रोजकेटमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे. आजपर्यंत या व्यक्तीने ८६ लाख रुपये दिले मात्र अद्याप त्याला फ्लॅट मिळालेला नाही. त्यानंतर या व्यक्तीने गौरी खान आणि इतर तीन व्यक्तींवर पैसे हडपल्याचा आरोप केला आहे. आयपीसी कलम ४०९ अंतर्गत गौरी खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा: चित्रपटासाठी साताऱ्यातील आख्खं गाव रंगवलं! हेमंत ढोमेने सांगितला किस्सा

तक्रारीमध्ये किरीट यांनी दावा केला आहे की तुलसुयानी गोल्फ व्यूचे सुशांत यांनी गोल्फ सिटी भागातील फ्लॅट इतर कोणाला तरी दिला आहे. गौरी खानसोबतच तुलस्यानी कंस्ट्रक्शन अँड डेवलपमेंट लिमिटेडचे सीएमडी अनिल कुमार आणि महेश तुलस्यानी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

२०१५मध्ये गौरी खान याची ब्राँड अँम्बेसिडर होती. तेव्हा ती प्रमोशन करत होती. गौरी खानने माहिती दिली होती की लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटी सेक्टर १ पॉकेट डीमध्ये फ्लॅट तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे किरीट जसवंत शाह यांनी येथे फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला. २०१६मध्ये त्यांनी ८६ लाख रुपयांना फ्लॅट खरेदी केला. मात्र अद्याप फ्लॅट ताब्यात मिळालेला नाही असे किरीट यांनी तक्रारीत म्हटले आहे.