मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: काळा मास्क, काळी टोपी; चेहरा लपवून दीपिका पोहोचली थिएटरमध्ये Video Viral

Pathaan: काळा मास्क, काळी टोपी; चेहरा लपवून दीपिका पोहोचली थिएटरमध्ये Video Viral

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 30, 2023, 01:53 PM IST

    • Deepika Padukone: पठाण चित्रपट पाहाताना चाहत्यांची प्रतिक्रिया कशी आहे हे पाहण्यासाठी दीपिका पादूकोण गुपचूप थिएटरमध्ये गेली आहे. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दीपिका पादूकोण (HT)

Deepika Padukone: पठाण चित्रपट पाहाताना चाहत्यांची प्रतिक्रिया कशी आहे हे पाहण्यासाठी दीपिका पादूकोण गुपचूप थिएटरमध्ये गेली आहे. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    • Deepika Padukone: पठाण चित्रपट पाहाताना चाहत्यांची प्रतिक्रिया कशी आहे हे पाहण्यासाठी दीपिका पादूकोण गुपचूप थिएटरमध्ये गेली आहे. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि अभिनेत्री दीपिका पादूकोणचा 'पठाण' हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जवळपास चार वर्षांनंतर शाहरुखने कमबॅक केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता दीपिकाने चित्रपट पाहाताना प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी गुपचूप थिएटरमध्ये हजेरी लावली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Kshitij Zarapkar Passed Away: मराठी अभिनेते क्षितिज झारापकर यांचं निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी

कपिलच्या शोमध्ये सनी असं काय म्हणाला की बॉबी देओलच्या डोळ्यात आलं पाणी? Viral video बघाच

अमृता खानविलकर नवरा हिमांशूसोबत फोटो का नाही शेअर करत? स्वतःच कारण सांगताना म्हणाली...

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

‘पठाण’ चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या ५ व्या दिवशी तब्बल ५०० कोटींचा टप्पा गाठला आहे. मीडिया रिपोर्टनुसार रविवारी भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सुमारे ६५ ते ७० कोटींची कमाई केली आहे. तर, जगभरात आकडा १२५ ते १३० कोटी रुपये इतका असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच दीपिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाचा: ‘पठाण’ला विरोध करणाऱ्यांसाठी प्रकाश राज यांनी केले ट्वीट

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दीपिकाने काळ्या रंगाचा हूडी घातली आहे. तसेच काळी टोपी, काळा मास्क लावून ती चेहरा लपवत थिएटरमध्ये पोहोचली आहे. पठाण पाहताना चाहत्यांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी दीपिका थिएटरमध्ये पोहोचल्याचे म्हटले जात आहे.

नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पठाण’ या चित्रपटाने आता जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा रोवला आहे. ‘पठाण’ या चित्रपटातून शाहरुख खान याने ४ वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. चार वर्षांच्या ब्रेकनंतरही शाहरुखची जादू तसूभरही कमी झालेली नाही.

‘पठाण’ चित्रपटातून शाहरुखने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ग्लॅमरस स्टाईलनेही धुमाकूळ घातला आहे. जॉन अब्राहम देखील खलनायकाच्या भूमिकेत हिट ठरल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या कॅमिओनेही या चित्रपटाला चार चाँद लावले आहेत.

विभाग