मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 16: टीना दत्तासाठी शालीनचा थेट सलमान खानशी पंगा! इशारा देत म्हणाला...

Bigg Boss 16: टीना दत्तासाठी शालीनचा थेट सलमान खानशी पंगा! इशारा देत म्हणाला...

Jan 07, 2023, 10:13 AM IST

    • Bigg Boss 16 latest Update: ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान टीना दत्ताची शाळा घेताना दिसला. यावेळी त्याने टीना दत्ताला चांगलेच बोल लगावले.
Bigg Boss 16 Latest Update

Bigg Boss 16 latest Update: ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान टीना दत्ताची शाळा घेताना दिसला. यावेळी त्याने टीना दत्ताला चांगलेच बोल लगावले.

    • Bigg Boss 16 latest Update: ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान टीना दत्ताची शाळा घेताना दिसला. यावेळी त्याने टीना दत्ताला चांगलेच बोल लगावले.

Bigg Boss 16 latest Update:बिग बॉस १६’मध्ये आता मोठा राडा पाहायला मिळाला आहे. यावेळी टीना दत्तासाठी शालीन भानोत थेट सलमान खानशी भांडताना दिसला आहे. दोघांमधील हा वाद आता चांगलाच चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस १६’च्या घरात टीना दत्ता आणि शालीन भानोत हि जोडी चांगलीच गाजली आहे. कधी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात दिसतात. तर, काही वेळा एकमेकांशी कडाक्याचे भांडण करताना दिसतात. यामुळे नेहमीच या शोला रंगत चढताना दिसते. आतापर्यंत शालीन अनेकांशी पंगा घेताना दिसला. मात्र, यावेळी त्याने थेट सलमान खानशी वाद घातला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमासाठी शाहरुख खान होता पहिली पसंती, का दिला नकार जाणून घ्या

Heeramandi Review: अंगावर शहारे आणणारी सीरिज! संजीदा शेख सोनाक्षी सिन्हा हिचावर भारी

'तुला पाहते रे' मालिकेतील अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागम, नवा प्रोमो प्रदर्शित

महेश कोठारेंची कमाल! मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार इन्स्पेक्टर महेश आणि लक्ष्याची धमाल! कशी? वाचाच...

‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान टीना दत्ताची शाळा घेताना दिसला. यावेळी त्याने टीना दत्ताला चांगलेच बोल लगावले. सलमान खान टीनाला म्हणाला की, 'टीना, तू कोणता गेम खेळत आहेस आणि कोणासोबत खेळत आहेस?' यावर उत्तर देताना टीना म्हणाली की, ‘सर, मी ड्रामा करत नव्हते. मला असा गेम खेळायचा नाही.’ यावेळी टीना दत्ता म्हणाली की, ती आणि शालीन कधीच एकमेकांच्या प्रेमात पडू शकत नाहीत. यावर सलमान चांगलाच संतापला आणि टीनाला म्हणाला की, तुम्ही दोघे भांडता आणि घरात गाणी वाजू लागताच लगेच दोघे एकत्र येऊन नाचू लागता.

सलमान खान टीना दत्ताला म्हणाला की, 'तुला या घरात एकत्र डान्स करण्यासाठी किंवा चिकटण्यासाठी दुसरं कुणीच दिसलं नाही का?’ सलमान खानचे हे बोल ऐकून शालीन भानोतला राग आला. तो कठोर स्वरात सलमान खानला म्हणाला की, टीना दत्ताशी नीट बोलायचं. यावर सलमान खानने देखील त्याला विचारले की, शालीन काय बोलत आहेस? मात्र, यावर त्याची बोलती बंद झाली आणि त्याने सलमानची माफी मागितली.

‘बिग बॉस १६’चा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. या घरातील स्पर्धक रोजच घरात नवे राडे घालताना दिसतात. कधी मैत्री, तर कधी वाद यामुळे ‘बिग बॉस १६’मधून प्रेक्षकांना नवा मनोरंजन मसाला मिळत आहे.