मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'आज ठाण्यात शिवसेना केवळ एकनाथ शिंदेंमुळे', आरोह वेलणकरचे वक्तव्य चर्चेत

'आज ठाण्यात शिवसेना केवळ एकनाथ शिंदेंमुळे', आरोह वेलणकरचे वक्तव्य चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi

Jun 27, 2022, 01:30 PM IST

    • आरोह वेलणकरने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले आहे.
आरोह वेलणकर (HT)

आरोह वेलणकरने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले आहे.

    • आरोह वेलणकरने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले आहे.

महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये एक वेगळंच राजकीय नाटक सध्या पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या विरोधात बंड करून सुरतमार्गे गुवाहाटीला गेलेले महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व ४० हून अधिक आमदार अद्याप राज्यात परतलेले नाहीत. त्यामुळे मंत्री व लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची कामे खोळंबली आहेत. तसेच एकनाथ शिंदेंच्या बंडावर शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, अभिनेता आरोह वेलणकरने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘रोशन सिंह सोढी’ साकारण्यासाठी गुरुचरण सिंहला किती मानधन मिळायचे?

अभिरामचं लग्न मोडण्यामागचं सत्य कुणाला कळू शकेल का? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत ट्वीस्ट

कुणालच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चैतन्यसोबत सुभेदार कुटुंबही झालं सज्ज! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमांचक वळण

भारतीय क्रिकेट टीमसाठी ‘अश्वत्थामा’ बनले अमिताभ बच्चन! सोशल मीडियावरील Viral Video पाहिलात का?

आरोह वेलणकर हा सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सध्याच्या राजकिय परिस्थितीवर प्रतिक्रिया देत असतो. पण आता त्याने एका मुलाखतीमध्ये त्याचे मत मांडले आहे. ‘शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना मोठे केले असे वारंवार बोलले जात आहे. मग एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेसाठी खूप काही केले आहे, याची जाणीव शिवसेनेला असायला हवी. आज ठाण्यात शिवसेना आहे ती केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळे आहे. त्यामुळे त्यांनीही सेनेला भरभरून दिले आहे,’ असे आरोह म्हणाला.
आणखी वाचा : राष्ट्रवादीचे ऐकून ज्या दिवशी मुख्यंमंत्री झालात...; आरोह वेलणकरचे ट्वीट चर्चे

आनंद दिघे यांचे शिष्य आणि राजकीय वासरदार...

शिवसेनेवर शिंदेंचं असलेलं प्रेम, कटवट हिंदुत्त्वाचा बाणा आणि लोकांचा जनसंपर्क पाहता आनंद दिघे यांच्या अकाली निधनानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्याची सूत्र शिंदेंकडे सोपवली. त्यानंतर शिंदेंचं शिवसेनेतलं राजकीय वजन वाढलं. आनंद दिघे यांनी एकनाथ शिंदेंची राजकीय सक्रियता आणि आंदोलनांतील सहभाग लक्षात घेता त्यांना ठाणे महापालिकेचा गटनेता म्हणून निवड केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात कधीही मागे वळून पाहिलं नाही. २००४ साली ते ठाण्यातील पाचपाखडी या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. तेव्हापासून आतापर्यंत या मतदारसंघात त्यांना कुणीही हरवू शकलेलं नाही.

विभाग