मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  राष्ट्रवादीचे ऐकून ज्या दिवशी मुख्यंमंत्री झालात...; आरोह वेलणकरचे ट्वीट चर्चेत
आरोह वेलणकर
आरोह वेलणकर (HT)
26 June 2022, 10:08 ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
26 June 2022, 10:08 IST
  • अभिनेता आरोह वेलणकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधीत केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shide) यांच्या बंडाळीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे गटाने ५० आमदार असल्याचे सांगत शक्तीप्रदर्शन गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये केले आहे. सत्तास्थापनेसाठी शिंदे गटाकडून हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, शनिवारी रात्री एकनाथ शिंदे हे एकटेच गुजरात मधील बडोद्यात एका विषेश विमानाने जात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतल्याचे समजत आहे. या भेटीत सत्ता स्थापनेसाठी चर्चा झाल्याचे समजत आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, अभिनेता आरोह वेलणकरने केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आरोहने एका पाठोपाठ एक असे ट्वीट केले आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेक करत, 'राष्ट्रवादीचे ऐकून ज्या दिवशी तुम्ही मुख्यंमंत्री झालात त्याच दिवशी धोक्याची घंटा वाजायला हवी होती. तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल पण ते म्हणतात ना “Straight trees are cut first”, असा काहिसा गेम झालाय. तुमच्या लोकांच ऐका साहेब, राष्ट्रवादीचे नको, ते कधीच कोणाचे नव्हते - एक हिंदू' असे आवाहन केले आहे.
आणखी वाचा : 'परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं', आरोह वेलणकरचे ट्वीट चर्चेत

दुसऱ्या ट्वीटमध्ये त्याने उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. 'स्वतःच्या पायावर धोंडा मारून नंतर २.५ वर्षांनी पचतावण्यात काय अर्थ आहे? - अराजकीय' असे ट्वीट आरोहने केले आहे.

आरोह वेलवणकर हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सामाजिक विषयावर देखील बिनधास्तपण त्याचे मत मांडताना दिसतो. यापूर्वी देखील त्याने एकनाथ शिंदे यांचे ट्वीट रिट्विट करत, 'परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं' असे म्हटले होते.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग