मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Drishyam 2 Review: ७ वर्षांनंतर पुन्हा विजय साळगावकरची एण्ट्री, धमाकेदार क्लायमॅक्स

Drishyam 2 Review: ७ वर्षांनंतर पुन्हा विजय साळगावकरची एण्ट्री, धमाकेदार क्लायमॅक्स

Aarti Vilas Borade HT Marathi

Nov 18, 2022, 10:33 AM IST

    • Ajay Devgan: दृश्यम २ या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार हे जाणून घ्या...
दृश्यम २ (HT)

Ajay Devgan: दृश्यम २ या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार हे जाणून घ्या...

    • Ajay Devgan: दृश्यम २ या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार हे जाणून घ्या...

२ आणि ३ ऑक्टोबर २०१४ला विजय साळगावकरने केलेल्या गुन्हाचा छडा पोलिस लावणार का? असा प्रश्न दृश्यम चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांना पडला आहे. आता प्रेक्षकांना त्यांच्या या आणि अशा काही प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. कारण दृश्यम २ हा चित्रपट आज, १८ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, अक्षय खन्ना हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

मराठी मनोरंजन विश्वाची ‘मँगो डॉली’! अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचे गाजलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

काय आहे चित्रपटाची कथा?

विजय साळगावकर आणि त्याचे कुटुंबीय गोव्यात राहात असतात. २ ऑक्टोबर रोजी त्यांच्यासोबत एक घटना घडते. आता दृश्यम २मध्ये केबल ऑपरेटर असणारा विजय साळगावकर एका थिएटरचा मालक असल्याचे पाहायला मिळते. त्याचे चित्रपटांचे वेड अजूनही असल्याचे दिसते. त्याला चित्रपट लिहायचा असतो. त्यासाठी तो एक लेखकाची भेट घेतो. पण कथा लिहिल्यानंतर तो त्या क्लायमॅक्सवर समाधानी नसतो. त्यामुळे तो पुन्हा त्यावर काम करण्यास सुरुवात करतो.

दुसरीकडे विजयचे कुटुंबीय सात वर्षांपूर्वी घडलेली घटना विसरलेले नाहीत. ते भीतीमध्ये जगत असतात. विजची मोठी मुलगी अंजूला पॅनिक अटॅक येत असतात तर विजयची पत्नी पोलिसांना पाहून सतत घाबरत असते. दरम्यान, चित्रपटात एसपी अक्षय खन्नाची एण्ट्री होते. हा एसपी तब्बूचा मित्र असतो. विजय साळगावकरच्या केसचा पुन्हा तपास करण्यासाठी त्याची नेमणूक करण्यात आली आहे.

अक्षय खन्ना पुन्हा तापस करायला सुरु करतो त्यामुळे क्रिमिनल इन्वेस्टिगेशनमध्ये फसलेलं विजय साळगावकरचं कुटुंब त्यातून वाचणार का? पोलिसांना मृतदेह सापडतो का? पोलीस आणि विजय यांच्यातील या लढ्यात कोणाला यश मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर मिळतील.

दृश्यम चित्रपट हा मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. मल्याळम चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामतने केले आहे. तसेच दृश्यम २ हा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता सर्वजण हिंदी रिमेकची वाट पाहात होते. आज अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

विभाग