मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte : "तू तीन मुलांची आई...", वीणाने अरुंधतीला विचारले अनिरुद्धविषयी प्रश्न

Aai Kuthe Kay Karte : "तू तीन मुलांची आई...", वीणाने अरुंधतीला विचारले अनिरुद्धविषयी प्रश्न

Aarti Vilas Borade HT Marathi

May 17, 2023, 06:16 PM IST

    • Aai Kuthe Kay Karte Marathi Serial update: आई कुठे काय करते मालिकेत वीणाच्या एण्ट्रीने रंजक वळण आले आहे
Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial update: आई कुठे काय करते मालिकेत वीणाच्या एण्ट्रीने रंजक वळण आले आहे

    • Aai Kuthe Kay Karte Marathi Serial update: आई कुठे काय करते मालिकेत वीणाच्या एण्ट्रीने रंजक वळण आले आहे

स्टार प्रवाहच्या आई कुठे काय करते या मालिकेत सध्या अनिश आणि ईशाचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याला कुटुंबातील सर्वच सदस्यांनी मजामस्ती केली. दरम्यान, ईशा आणि अनिशच्या साखरपुड्यानिमित्त आशुतोषची बहिण वीणाची मालिकेत एण्ट्री झाली. तिच्या एण्ट्रीने मालिका एका रंजक वळणावर पोहोचली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महेश कोठारेंची कमाल! मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार इन्स्पेक्टर महेश आणि लक्ष्याची धमाल! कशी? वाचाच...

निलेश साबळेच्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’मध्ये श्रेया, कुशल आणि भारत का नाहीत? अभिनेत्याने थेट दिले उत्तर!

ये राम तो रॅम्बो निकला रे! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये अभिरामचा डॅशिंग अंदाज पाहून लीलाही हैराण!

तयार राहा... ‘बाहुबली’ पुन्हा येतोय! एसएस राजमौलींनी प्रेक्षकांना दिलं तगडं सरप्राईज! नव्या प्रोजेक्टची घोषणा

सध्या सोशल मीडियावर 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये वीणा अरुंधतीला तिच्या आणि आशुतोषच्या लव्ह स्टोरीबद्दल विचारताना दिसत आहे. ती म्हणतेय,"तू तीन मुलांची आई आहेस आणि अनिरुद्धसोबत २५-२६ वर्षांचा संसारही केलास." त्यानंतर अरुंधती वीणाचे प्रश्न टाळताना दिसते. ती वीणाला म्हणते "याविषयावर आपण नंतर कधीतरी बोलू."
वाचा: कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिकिटांची किंमत माहितेय का? जाणून बसेल धक्का

वीणा मात्र अरुंधतीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि तिचे बोलणे सुरु ठेवते. "अनिरुद्ध खूप चांगला आहे. त्यानेच मला आत्मविश्वास दिला की मी हा बिझनेस नक्की पुढे नेऊ शकते" असे वीणा म्हणते. त्यानंतर अरुंधती त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता तिला झोपी जाण्याचा सल्ला देते.

वीणा ही आशुतोषची सख्खी बहीण नसून ती त्याच्या आत्याची मुलगी आहे. सुलेखाताईंना मात्र वीणा त्यांच्या मुलीसारखीच आहे. आता वीणाच्या येण्याने आशुतोष आणि अरुंधती यांच्या नात्यावर परिणाम होणार का? वीणा अनिरुद्धसोबत जवळीक साधणार का? असे अनेक प्रश्ना चाहत्यांना पडले आहे. आगामी भागामध्ये प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

विभाग