मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Cannes Film Festival: कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिकिटांची किंमत माहितेय का? जाणून बसेल धक्का

Cannes Film Festival: कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिकिटांची किंमत माहितेय का? जाणून बसेल धक्का

Aarti Vilas Borade HT Marathi
May 16, 2023 04:27 PM IST

Cannes Film Festival 2023: यंदाचा ७६वा कान्स चित्रपट महोत्सव सुरु झाला आहे. पण या महोत्सवाच्या तिकीटांची किंमत तुम्हाला माहिती आहे का?

Cannes Film Festival 2023
Cannes Film Festival 2023

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वात मोठा फिल्म फेस्टिव्हल म्हणजेच कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला गेला आहे. यंदाचा ७६वा कान्स चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. १६ मे ते २७ मे या दरम्यान कान्स चित्रपट महोत्सव रंगणार आहे. दरवर्षी अनेक सेलेब्स या रेड कार्पेटवर पदार्पण करतात. यामध्ये बॉलिवूड स्टार्सचाही समावेश असतो. यावर्षी देखील अनेक बॉलिवूड कलाकार या रेड कार्पेटवर डेब्यू करणार आहेत. पण तुम्हाला या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिकीटांची किंमत माहिती आहे का? चला जाणून घेऊया...

जगभरातील उत्तमोत्तम कलाकृती दर वर्षीप्रमाणे या वर्षीच्याही ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये पाहता येणार आहेत. या चित्रपट महोत्सवाला दरवर्षी मोठ्या रक्कमेची तिकीटे ठेवण्यात येतात. यावर्षी ५ ते २० लाख रुपये तिकीट ठेवण्यात आले आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तिकीट काढल्यानंतरच आत प्रवेश दिला जातो. कान्सच्या ऑफिशिअल वेबसाइटवर ही तिकिटे उपलब्ध आहेत.
वाचा: बिग बींनी अनोळखी व्यक्तीकडे मागितली लिफ्ट; नेटकऱ्यांनी केले मुंबई पोलिसांना टॅग

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करणार आहे. या महोत्सवातील एका भव्यदिव्य कार्यक्रमात अनुष्का सहभागी होणार आहे. या कार्यक्रमामध्ये चित्रपटसृष्टीतील महिलांचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमात अभिनेत्रीसोबत हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री केट विन्सलेट देखील सहभागी होणार आहे. अनुष्का शर्मा व्यतिरिक्त, माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर देखील यावेळी कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा दाखवताना दिसणार आहे. या कार्यक्रमात मानुषी अभिनेत्री अनुष्कासोबत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी देखील यंदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहे. सनी कान्स २०२३च्या एका कार्यक्रमात सहभागी होणार असून, रेड कार्पेटवर तिचे सौंदर्य दाखवणार आहे. सनी कान्समध्ये सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग