मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte : वीणा अनिरुद्धला दाखवणार त्याची जागा, मालिका रंजक वळणावर

Aai Kuthe Kay Karte : वीणा अनिरुद्धला दाखवणार त्याची जागा, मालिका रंजक वळणावर

Aarti Vilas Borade HT Marathi

May 16, 2023, 02:12 PM IST

    • Aai Kuthe Kay Karte Marathi Serial update: काही दिवसांपूर्वी मालिकेत आशुतोषची बहिण वीणाची एण्ट्री झाली आहे. आता वीणा अनिरुद्धला त्याची जागा दाखवणार आहे.
Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial update: काही दिवसांपूर्वी मालिकेत आशुतोषची बहिण वीणाची एण्ट्री झाली आहे. आता वीणा अनिरुद्धला त्याची जागा दाखवणार आहे.

    • Aai Kuthe Kay Karte Marathi Serial update: काही दिवसांपूर्वी मालिकेत आशुतोषची बहिण वीणाची एण्ट्री झाली आहे. आता वीणा अनिरुद्धला त्याची जागा दाखवणार आहे.

स्टार प्रवाहच्या आई कुठे काय करते या मालिकेत सध्या अनिश आणि ईशाच्या साखरपुड्याची लगबग पाहायला मिळत आहे. अशातच मालिका आता वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. मालिकेत वीणा या पात्राचा उल्लेख वारंवार येतोय आणि तिची आता एण्ट्री झाली आहे. वीणा मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्धला चांगलाच धडा शिकवणार असल्याचे दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘सोढी’ हरवलाय! आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

आई कुठे काय करते मालिकेत आशुतोषची बहिण वीणा या नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे. ती ईशा आणि अनिशच्या साखरपुड्याला येणार आहे. आता ती अनिरुद्धची बिझनेस पार्टनर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मालिका आता रंजक वळणावर पोहोचली आहे.
वाचा: आमच्या घरातलं वादळ तुमच्या घरी घेऊन जातोय; ईशाच्या साखरपुड्यात यश झाला भावूक

स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आई कुठे काय करते मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये वीणा अनिरुद्धला त्याची जागा दाखवताना दिसत आहे. वीणाच्या येण्याने अनिरुद्ध, आशुतोष आणि अरुंधती यांच्यात वाद होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

प्रोमोमध्ये वीणा आणि आशुतोष यांच्यामध्ये संभाशण सुरु असते. "बाबांचा बिझनेस आता मी सांभाळणार आहे. अनिरुद्धदेखील माझ्या मदतीला आहे. तुला चालेल ना?" वीणा असे बोलत असते. तेवढ्यात अनिरुद्ध तेथे आणि दोघांच्यामध्ये बोलतो, "माफ करा... मी मध्ये बोलतोय. पण यांना विचारण्याची काही गरज नाही. आता तू एकटी नाहीस... मी आहे तुझ्यासोबत." ते ऐकून वीणा अनिरुद्धला चांगलेच सुनावते. "आशु मला सख्ख्या भावासारखा आहे. त्यामुळे त्याला विचारल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही" असे ती म्हणते.

विभाग