मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: आमच्या घरातलं वादळ तुमच्या घरी घेऊन जातोय; ईशाच्या साखरपुड्यात यश झाला भावूक

Aai Kuthe Kay Karte: आमच्या घरातलं वादळ तुमच्या घरी घेऊन जातोय; ईशाच्या साखरपुड्यात यश झाला भावूक

Aarti Vilas Borade HT Marathi
May 15, 2023 12:30 PM IST

Aai Kuthe Kay Karte Update: नाच आणि गाण्यांनी रंगला ईशा आणि अनिषचा साखरपुडा सोहळा… यशने व्यक्त केलं बहिणवरचं प्रेम…

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

गेल्या काही दिवसांपासून 'आई कुठे काय करते' मालिकेत ईशा आणि अनिशच्या लग्नाचा ट्रॅक पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ईशाच्या लग्नाला विरोध करणारा अनिरुद्ध लेकीच्या सुखापुढे नमते घेतो आणि तयार होतो. आता अखेर मालिकेत ईशाचा साखरपुडा पार पडणार आहे. या साखरपुड्यात नाच आणि गाण्यांची मैफिल रंगणार आहे. दरम्यान, यश भावूक झाल्याचे पाहायला मिळते.

स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ईशाच्या साखरपुडा होत असल्याचे दिसत आहे. त्यावेळी यश अनिशला ईशाविषयी काही गोष्टी सांगत असतो.
वाचा: आई कुठेही असली तरी तिला आपल्या मुलांची काळजी असते, भावूक करणारा प्रोमो प्रदर्शित

यश सर्वांसमोर बोलतो की, 'ईशा इतकी रडकी आहे ना, सतत तिच्या नाकावर राग असतो आणि डोळ्यात पाणी असते. पण तुला भेटल्यापासून तिच्या नाकावरचा रागही तुझ्यासाठी आहे आणि डोळ्यातलं पाणी पण तुझ्यासाठी आहे. ईशा अत्यंत मूडी आहे. क्षणाक्षणाला तिचे निर्णय, मूड बदलत असतात. ती लहानपणापासूनच अशी आहे. पण एकच गोष्ट आजपर्यंत बदलली नाहीये आणि ती म्हणजे तिचं प्रेम. तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी हे सहज सगळ्यांना सांगू शकतो. खरं तर तू आमच्या घरालं वादळ तुमच्या घरी घेऊन चालला आहेस. पण हे वादळ नुकसान करणार नाही.'

त्यानंतर अरुंधती आणि आशुतोष गाणे गातात. तर संजना, यश, अभी, अनिषचे आई-वडील सर्वजण डान्स करताता. त्यानंतर ईशा अनिरुद्धला देखील डान्स करण्यासाठी बोलावते. अनिरुद्ध बेधुंद होऊन डान्स करतो. सर्वजण त्याच्याकडे पाहात बसतात.

IPL_Entry_Point

विभाग