मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Atul londhe : 'मुनगंटीवारांना आम्ही 'शिलाजित' देऊ...' गडकरींच्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका

Atul londhe : 'मुनगंटीवारांना आम्ही 'शिलाजित' देऊ...' गडकरींच्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका

Apr 16, 2024, 06:36 PM IST

    • Congress leader Atul londhe on Nitin Gadkari : चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ राजुरा इथे झालेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे.
'मुणगंटीवारांना आम्ही 'शिलाजित' देऊ...' गडकरींच्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका

Congress leader Atul londhe on Nitin Gadkari : चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ राजुरा इथे झालेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे.

    • Congress leader Atul londhe on Nitin Gadkari : चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ राजुरा इथे झालेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे.

Congress leader Atul londhe on Nitin Gadkari : चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ राजुरा इथे झालेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे. गडकरी यांच्या वक्तव्याचा  काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी समाचार घेत त्यांच्यावर टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ajit Pawar : ‘मंत्री होतो काय? आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो”; अजित पवारांचं आणखी एका आमदाराला खुलं चॅलेंज

Raj Thackeray : मुंबईत मोदी-राज ठाकरेंची ऐतिहासिक सभा; शिवतीर्थावरील रॅलीचा पहिला टिझर आला समोर, Video

Rahul Gandhi : 'मोदींच्या हातातून निवडणूक निसटलीय, येत्या ४- ५ दिवसात ते...', राहुल गांधीनी तरुणांना केलं सावध

Sanjay Raut : अमित शहा येणार का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करू, संजय राऊतांचा खोचक टोला

Haryana : लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या यूट्यूबर जोडप्यानं उचललं टोकाच पाऊल! ७ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

काँग्रेसने चंद्रपूर लोकसभेसाठी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रतिभा धानोरकर या काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची केवळ एक जागा निवडून आली होती. बाळू धानोरकर हे महाराष्ट्रातील एकमेव खासदार होते. ज्यांनी महाराष्ट्रात विजय मिळवला. दरम्यान, बाळू धानोरकर यांचे मे २०२३ मध्ये निधन झाले. त्यानंतर काँग्रेस पक्षाने प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात भाजपने सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचार सभेत बोलतांना नितीन गडकरी यांनी वरील विधान केले होते.

KKR Vs LSG : केकेआरची प्रथम गोलंदाजी, लखनौकडून शमार जोसेफचं पदार्पण, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

काय म्हणाले होते नितीन गडकरी?

चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ राजुरा इथे जाहीर सभा झाली होती. या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत गडकरी म्हणाले, मी जे बोलतो ते करुन दाखवतो. सुधीर मुनगंटीवार यांच्या सारख्या कर्तुत्ववान खासदाराला संसदेत पाठवा. त्यांच्या मागे मोदीजींची ताकद, माझी ताकद आणि ट्रीपल इंजिन असेल. अस पॉवरफुल शिलाजीत देऊ की बास विकासाचं काम एकदम जोरात होईल.

गडकरी तुमचं शिलाजित राजकारणात लाज आणणारं: अतुल लोंढे

गडकरी यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेत काँग्रेसचे नेते अतुल लोंढे म्हणाले, चंद्रपूर येथे आमची भगिनी निवडणूक लढवत आहे. बाळू धानोरकर यांचं निधन झाल्याने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या निवडणूक लढवत आहेत. केवळ ३७ वर्षांची ही पोरगी दोन मुले असतांना पतीच्या अकाली निधनाने निवडणूक लढवत आहे. पण, नितीन गडकरी यांनी केलेले व्यक्तव्य हे राजकारनाला लाज आणणारे आहे. तुम्ही कसा उमेदवार निवडणूक दिला असे देखील लोंढे यांनी म्हणत नितीन गडकरी यांच्यावर टीका केली आहे.