मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Loksabha Elections 2024 : ‘प्रकाश आंबेडकर सोबत असो किंवा नसो..', संजय राऊतांचं मोठं विधान

Loksabha Elections 2024 : ‘प्रकाश आंबेडकर सोबत असो किंवा नसो..', संजय राऊतांचं मोठं विधान

Mar 25, 2024, 10:41 PM IST

  • Sanjay Raut On Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर सोबत असले किंवा नसले तरीही आम्ही ही निवडणूक जिंकू, राज्यातील जनमत आमच्या बाजुने आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य

Sanjay Raut On Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर सोबत असले किंवा नसले तरीही आम्ही ही निवडणूक जिंकू,राज्यातील जनमत आमच्या बाजुने आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • Sanjay Raut On Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर सोबत असले किंवा नसले तरीही आम्ही ही निवडणूक जिंकू, राज्यातील जनमत आमच्या बाजुने आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा काथ्याकूट असून सुरूच असून काही जागांवरील वाद कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या (मंगळवार) शिवसेना ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी सामनामधून जाहीर होणार आहे. उद्या शिवसेनेची पहिल्या यादीत १५ ते १६ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पहिल्यादांचा उमेदवार यादी सामनातून जाहीर करण्यात येणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Uddhav Thackeray: …अन्यथा तुमचे शटर बंद करू; मराठी माणसांना नोकरी नाकारणाऱ्या कंपनीला उद्धव ठाकरेंचं अल्टिमेटम!

Viral Video: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला धमकावणाऱ्या आमदाराचा व्हिडिओ व्हायरल, निवडणूक आयोगाकडे तक्रार!

Devendra Fadnavis: धुळ्यात देवेंद्र फडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, प्रलंबित प्रश्नांवरून आदिवासी, कोळी बांधव आक्रमक!

Summon to BJP chief Nadda: वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी भाजप अध्यक्ष जेपी नड्डांना पोलिसांनी बजावली नोटीस

वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत असावी, अशी आमची इच्छा आहे. मात्र याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांना घ्यायचा आहे. ते सोबत असले किंवा नसले तरीही आम्ही ही निवडणूक जिंकू, राज्यातील जनमत आमच्या बाजुने आहे. प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत असते तर आमचं मताधिक्य आणखी वाढलं असतं, मात्र याचा अर्थ आम्ही परावलंवी नाही. 

संजय राउत म्हणाले की, वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यावर त्यांचे समाधान झालेले नाही. महाविकासआघाडीमध्ये ४ ते ५ पक्ष असल्याने सर्वांना वाटा मिळायला हवा. 

महाराष्ट्रातील शोषित, वंचित, पीडित जनता आमच्यासोबतच आहे. प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत ते आमच्यासोबतच आहेत. आम्ही त्यांना वारंवार विनंती केली आहे. ते आमच्यासोबत येतील याची आशा मआम्ही सोडलेली नाही, असेही संजय राऊतांनी म्हटलं आहे..

भाजपावर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले की, भाजप मोठा पक्ष नाही कधीही नव्हता.  एखादा दरोडेखोर चोऱ्या करून दरोडे घालून आपली संपत्ती वाढवतो आणि म्हणतो मी श्रीमंत आहे, तसं भाजपचं आहे. दुसऱ्यांचे पक्ष फोडायचे आणि लहान पक्ष विकत घ्यायचे, अशाने हा पक्ष फुगला आहे.