मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Vanchit Bahujan Aaghadi: मोठी बातमी! 'वंचित' कडून शिरुरमधून मंगलदास बांदल यांची उमेदवारी तडकाफडकी रद्द

Vanchit Bahujan Aaghadi: मोठी बातमी! 'वंचित' कडून शिरुरमधून मंगलदास बांदल यांची उमेदवारी तडकाफडकी रद्द

Apr 06, 2024, 06:52 PM IST

  • Vanchit Bahujan Aghadi : वंचितने शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांची उमेदवारी रद्द केली आहे. पक्षाच्या धोरणाच्या विरोधात गेल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

'वंचित' कडून शिरुरमधून मंगलदास बांदल यांची उमेदवारी तडकाफडकी रद्द

Vanchit Bahujan Aghadi : वंचितने शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मंगलदास बांदल (Mangaldas Bandal)यांची उमेदवारी रद्द केली आहे. पक्षाच्या धोरणाच्या विरोधात गेल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

  • Vanchit Bahujan Aghadi : वंचितने शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांची उमेदवारी रद्द केली आहे. पक्षाच्या धोरणाच्या विरोधात गेल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

वंचितच्या निर्णयाने राजकारणात खळबळ माजली असून त्यांनी आपल्या एका उमेदवाराची लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी रद्द केली आहे. शिवसेना शिंदे गटानंतर आता वंचितवरही (Vanchit Bahujan Aghadi)आपला उमेदवार मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे. वंचितने शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांची उमेदवारी रद्द केली आहे. वंचितने बारामती मतदारसंघात उमेदवार न देता सुप्रिया सुळे यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता. या निर्णयाच्या विरोधात गेल्याने मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द केल्याचे स्पष्टीकरण वंचितकडून देण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

MCC violation: जाहिरातीच्या माध्यमातून आचारसंहितेचे उल्लंघन, मराठी दैनिकाविरोधात गुन्हा दाखल

Uddhav Thackeray: …अन्यथा तुमचे शटर बंद करू; मराठी माणसांना नोकरी नाकारणाऱ्या कंपनीला उद्धव ठाकरेंचं अल्टिमेटम!

Viral Video: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला धमकावणाऱ्या आमदाराचा व्हिडिओ व्हायरल, निवडणूक आयोगाकडे तक्रार!

Devendra Fadnavis: धुळ्यात देवेंद्र फडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, प्रलंबित प्रश्नांवरून आदिवासी, कोळी बांधव आक्रमक!

वंचितचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली होती. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते. बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी रद्द केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

 

देवेंद्र फडणवीसांना भेटणं भोवलं -

दरम्यान देवेंद्र फडणवीसांना भेटणे बांदल यांना भोवल्याचे म्हटले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापूर दौऱ्यावर असताना शुक्रवारी दशरथ माने यांच्या घरी गेले होते. तेथे मंगलदास बांदल हेदेखील उपस्थित होते. बांदळ यांचे फडणवीसांसोबतच फोटो हायरल झाल्यानंतर वंचितवर टीका केली जात होती. वंचित भाजपची बी टीम असल्याची टीका होत होती. याची दखल घेऊन वंचितने आता मंगलदास बांदल यांची उमेदवारीच रद्द केली आहे.

वंचितकडून २५ मतदारसंघात उमेरवारी ४ उमेदवार मागे -

वंचित बहुजन आघाडीकडून राज्यातील २५ लोकसभा मतदारसंघांमध्ये आपले उमेदवारी जाहीर केले होते. आतापर्यंत त्यापैकी चार उमेदवार बदलण्यात आले आहेत. रामटेकमध्ये वंचितकडून शंकर चहांदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र नंतर त्या ठिकाणी काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर करत आपला उमेदवार मागे घेतला.

त्याचबरोबर वाशिम-यवतमाळ मतदारसंघात वंचितने आधी जाहीर केलेली सुभाष पवार यांची उमेदवारी रद्द करत अभिजित राठोड यांना संधी दिली मात्र राठोड यांचा अर्ज बाद झाल्याने वंचितला मोठा फटका बसला.