मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share tips : तुमच्या पोर्टफोलियोमध्ये ठेवा हे आयटी स्टाॅक ठेवा... मिळेल कमाईची संधी

Share tips : तुमच्या पोर्टफोलियोमध्ये ठेवा हे आयटी स्टाॅक ठेवा... मिळेल कमाईची संधी

Dec 02, 2022, 05:17 PM IST

    • Share tips : आयटी शेअर्समध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. सप्टेंबर २०२२ च्या अखेरीपासून, निफ्टी आयटी निर्देशांकात सुमारे १५ टक्के वाढ झाली आहे. शेअर तज्ज्ञांनीही शेअर्स खरेदीचा सल्ला दिला आहे. 
Share market HT

Share tips : आयटी शेअर्समध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. सप्टेंबर २०२२ च्या अखेरीपासून, निफ्टी आयटी निर्देशांकात सुमारे १५ टक्के वाढ झाली आहे. शेअर तज्ज्ञांनीही शेअर्स खरेदीचा सल्ला दिला आहे.

    • Share tips : आयटी शेअर्समध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. सप्टेंबर २०२२ च्या अखेरीपासून, निफ्टी आयटी निर्देशांकात सुमारे १५ टक्के वाढ झाली आहे. शेअर तज्ज्ञांनीही शेअर्स खरेदीचा सल्ला दिला आहे. 

Share tips : आयटी शेअर्समध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. सप्टेंबर २०२२ च्या अखेरीपासून, निफ्टी आयटी निर्देशांकात सुमारे १५ टक्के वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आयटी कंपन्यांनी अपेक्षित महसूल मिळवला आहे. त्याचबरोबर मार्जिनमध्येही काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात मार्जिन ट्रॅजेक्टरीमध्येही काही प्रमाणात वाढ झाली आहे. तथापि, मंदीची भीती, वाढणारे व्याजदर आणि भू-राजकीय तणाव यासारख्या घटकांचा मुल्यांकनाची टांगती तलवार या क्षेत्रावर कायम आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

Ola layoffs : 'ओला' करणार १० टक्के कर्मचारी कपात! सीईओ हेमंत बक्षी यांनी दिला राजीनामा

या क्षेत्राची मध्यम वाढ, गेल्या काही तिमाहीत नवीन नियुक्ती, टॅलेंट पूलचा विस्तार आणि स्टार्ट-अप्सची टाळेबंदी यामुळे नोकरी सोडणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. ब्रोकरेजच्या मते, सेक्टरच्या इबीआयटी मार्जिनमध्ये दुसऱ्या सहामाहीत सुधारणा होईल.

या कंपन्या देतील अधिक परतावा, अशी करा गुंतवणूक 

टाॅप पिक्सशेअर रेटिंग्ज टार्गेट्स (रुपये)
टीसीएसहोल्ड३१००
इन्फोसिसबाय१६००
एचसीएल टेकबाय१०७०
विप्रो बाय४६० 
टेक महिंद्राबाय१२००
एमफासिसबाय२६००
पर्सिस्टंटबाय ३९५०
बिर्ला साॅफ्टबाय३७० 
एलटीआय होल्ड४५००

महसुलावर दबाव

ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबलच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कामाचे दिवस कमी झाल्यामुळे, अधिक सुट्ट्या आणि मॅक्रो अनिश्चिततेमुळे निर्णय घेण्यास होणारा विलंब यामुळे महसुलावर परिणाम होईल. जागतिक पातळीवरील अस्थिरतेमुळे कंपन्यांना मोठ्या आँर्डर्ससाठी वाट पहावी लागणार आहे. पण आगामी काळात आयटी स्टाॅक्स अधिक सक्षमपणे गुंतवणूकदारांना परतावा देतील, असा विश्वास गुंतवणूक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 

(डिस्‍क्‍लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

विभाग