मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tata Group Stock : टाटा समूहाच्या तोट्यात असलेल्या कंपनीनं दिली खूशखबर! शेअर मार्केट तज्ञ म्हणतात…

Tata Group Stock : टाटा समूहाच्या तोट्यात असलेल्या कंपनीनं दिली खूशखबर! शेअर मार्केट तज्ञ म्हणतात…

Apr 06, 2023, 06:27 PM IST

  • Tata Group Stock : टाटा समूहाच्या तोट्यात असलेल्या एका मोठ्या कंपनीनं गुंतवणूकदारांना खूशखबर दिली आहे.

Tata Steel

Tata Group Stock : टाटा समूहाच्या तोट्यात असलेल्या एका मोठ्या कंपनीनं गुंतवणूकदारांना खूशखबर दिली आहे.

  • Tata Group Stock : टाटा समूहाच्या तोट्यात असलेल्या एका मोठ्या कंपनीनं गुंतवणूकदारांना खूशखबर दिली आहे.

Tata Group Stock : देशातील आघाडीचं उद्योग समूह टाटाच्या तोट्यात असलेल्या टाटा स्टील इंडिया (Tata Steel) या कंपनीनं गुंतवणूकदारांना खूशखबर दिली आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात टाटा स्टीलनं सुमारे १९.९ दशलक्ष टन कच्च्या स्टीलचं उत्पादन केलं आहे. तुलनात्मक आकडेवारी पाहता हे सर्वाधिक वार्षिक उत्पादन आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Export duty on onion : कांद्याच्या संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४० टक्के निर्यात शुल्क लागू

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

अस्थिर वातावरण असतानाही टाटा स्टीलनं केलेली ही कामगिरी उत्साहवर्धक आहे. या कामगिरीचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजनं टाटा स्टीलच्या स्टॉकला बाय रेटिंग दिलं आहे. याचाच अर्थ या फर्मनं टाटा स्टीलचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

ICICI सिक्युरिटीजनं टाटा स्टीलचं टार्गेट प्राइसही निश्चित केलं आहे. हा शेअर १२० रुपयांपर्यंत जाईल असं सांगण्यात आलं आहे. एनएसई (National Stock Exchange) वर टाटा स्टीलचा शेअर आज १०४.५० रुपयांवर ट्रेड करत आहे. याचाच अर्थ पुढील काही दिवसांत तो १६ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. टाटा स्टीलचे शेअर्स मागच्या एका वर्षात जवळपास २२ टक्क्यांनी घसरले आहेत, तर गेल्या सहा महिन्यांत ते स्थिर राहिले आहेत. त्यात कुठलाही मोठा चढउतार दिसलेला नाही.

मार्च तिमाहीत उत्पादन

आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत, म्हणजे जानेवारी ते मार्च दरम्यान, कंपनीचं कच्च्या स्टीलचं उत्पादन ३ टक्क्यांनी वाढून सुमारे ५.१५ दशलक्ष टन झालं आहे. त्याचबरोबर, वितरण ९ टक्क्यांनी वाढून ५.१५ दशलक्ष टन झाली. एका तिमाहीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. उत्पादन किंवा वितरणामध्ये ही वाढ तिमाही आधारावर नोंदवली गेली आहे.

डिसेंबरच्या तिमाहीत झाला होता तोटा

गेल्या आर्थिक वर्षाच्या डिसेंबरच्या तिमाहीत टाटा स्टीलला २,५०२ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. मात्र, वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीचा नफा ९,५९८.१६ कोटी रुपये होता. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नफ्यातील ही घसरण खर्चातील वाढीमुळं झाली आहे.

 

(सूचना: हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच याबाबतीत निर्णय घ्यावा.)

विभाग