मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani group : संकट काळात अदानी समूहाला साथ देणाऱ्या 'या' कंपनीच्या हाती लागलं घबाड

Adani group : संकट काळात अदानी समूहाला साथ देणाऱ्या 'या' कंपनीच्या हाती लागलं घबाड

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 06, 2023 05:26 PM IST

Adani group : उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करण्यात विशेष स्वारस्य असलेल्या या समुहाने २ अब्ज डाॅलर्स गुंतवणूकीवर अवघ्या एका महिन्यात अदानी समूहाच्या शेअर्समधून १०० टक्के नफा कमावला आहे.

Gautam adani HT
Gautam adani HT

Adani group : हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर, जेव्हा गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर विकले जात होते, त्या वेळी जीक्यूसी पार्टनर्सचे राजीव जैन यांनी गौतम अदानी यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या कंपन्यांचे २ अब्ज डाॅलर्स किमतीचे शेअर्स खरेदी केले. उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करण्यात विशेष स्वारस्य असलेल्या राजीव जैन यांनी अवघ्या एका महिन्यात अदानी समूहाच्या शेअर्समधून १०० टक्के नफा कमावला आहे.

गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या फेब्रुवारीच्या नीचांकी स्तरावरून १००% वर चढले आहेत. यामुळे राजीव जैन यांची जीक्यूसी भागीदारांची गुंतवणूक केवळ एका महिन्यात दुप्पट झाली आहे. जीक्यूसी पार्टनर्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी गौतम अदानी समूहावर मोठा सट्टा लावत आहेत. गौतम अदानी समूहाची कंपनी आगामी काळात मोठ्या प्रमाणात कम बॅक करु शकते, असे त्यांनी म्हटले आहे. जीक्यूसी पार्टनर्सचे राजीव जैन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, “गौतम अदानी ग्रुपचे शेअर्स पुढील ५ वर्षांत मल्टीबॅगर परतावा देऊ शकतात.”

अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांना त्यांच्या अडचणीच्या वेळी जीक्यूसी पार्टनर्सचे राजीव जैन यांनी खूप मदत केली. अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर गौतम अदानी समूहाचे बाजार मूल्य १५३ अब्ज डॉलरने कमी झाले आहे.

गौतम अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अस्थिरता आणण्यासाठी हेराफेरी केली जाते आणि त्यांच्या खात्यांमध्ये तफावत असल्याचा आरोप हिंडेनबर्ग रिसर्चने केला होता. तेव्हापासून गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री सुरू होती.

जीक्यूसीचे राजीव जैन यांनी म्हटले आहे की, गौतम अदानी समूहासारख्या कंपन्या भारत सरकारला देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेत खूप मदत करू करत आहेत. तसेच चीनसारख्या देशाऐवजी भारताला उत्पादकाचे पसंतीचे स्थान बनवू यामुळे गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांचे मूल्य पुढील १० वर्षांत लक्षणीय वाढू शकते आणि त्यात गुंतवणूक करून उत्तम परतावा मिळू शकतो.

WhatsApp channel

संबंधित बातम्या