मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO : डेटा अॅनालिटीक्सवर आधारित या कंपनीचा आयपीओ सज्ज, प्राईस बॅड ८५ -९० रुपये प्रती शेअर्स

IPO : डेटा अॅनालिटीक्सवर आधारित या कंपनीचा आयपीओ सज्ज, प्राईस बॅड ८५ -९० रुपये प्रती शेअर्स

Feb 28, 2023, 06:17 PM IST

    • IPO : डेटा आणि अनॅलिटीक्सवर भर देणारी कंपनी सिस्टॅंगो टेक्नॉलॉजीज लिमिटेड आपला आयपीओ लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा आयपीओ २ मार्च रोजी दाखल होत आहे.
IPO HT

IPO : डेटा आणि अनॅलिटीक्सवर भर देणारी कंपनी सिस्टॅंगो टेक्नॉलॉजीज लिमिटेड आपला आयपीओ लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा आयपीओ २ मार्च रोजी दाखल होत आहे.

    • IPO : डेटा आणि अनॅलिटीक्सवर भर देणारी कंपनी सिस्टॅंगो टेक्नॉलॉजीज लिमिटेड आपला आयपीओ लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा आयपीओ २ मार्च रोजी दाखल होत आहे.

IPO : डेटा आणि अनॅलिटीक्सवर भर देणारी कंपनी सिस्टॅंगो टेक्नॉलॉजीज लिमिटेड आपला आयपीओ लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. या आयपीओची इश्यू साईज ३२.८८ ते ३४.८२ कोटी रुपये असणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

२ मार्च रोजी होणार खुला

सिस्टॅंगो टेक्नॉलॉजीजच्या आयपीओचा प्राईस बँड १० रुपये प्रति समभाग दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक शेअरसाठी ८५ ते ९० रुपये निश्चित करण्यात आला आहे. हा आयपीओ २ मार्च २०२३ रोजी खुला होऊन ६ मार्च २०२३ रोजी बंद होणार आहे. सिस्टॅंगो टेक्नॉलॉजीजच्या आयपीओच्या अलॉटमेंटच्या स्थितीची घोषणा १० मार्च २०२३ रोजी केली जाईल. १५ मार्च २०२३ रोजी ही कंपनी एनएसई इमर्जवर सूचिबद्ध होईल अशी अपेक्षा आहे.

हेम सिक्युरिटीज लीड मॅनेजर

हेम सिक्युरिटीज हे सिस्टॅंगो टेक्नॉलॉजीजच्या आयपीओचे लीड मॅनेजर असून बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे रजिस्ट्रार असतील. व्यवसायांना आपले स्वतःचे कस्टमाइज्ड डिजिटल प्लॅटफॉर्म्स डिझाईन करून लागू करता यावेत व त्यांचे व्यवस्थापन करता यावे यासाठी लागणारी सॉफ्टवेयर सोल्युशन्स पुरवण्याचा सिस्टॅंगो टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा व्यवसाय आहे. यामध्ये वेब२, वेब३ आणि मोबाईल ऍप्लिकेशन्सचा समावेश आहे. फिनटेक, फँटसी स्पोर्ट्स, हॉस्पिटॅलिटी इत्यादी विविध क्षेत्रातील ग्राहक या कंपनीच्या सेवांचा लाभ घेत आहेत.

इक्विटी

या इश्यूमध्ये कंपनीच्या नव्याने जारी करण्यात आलेल्या ३८६८८०० पर्यंत इक्विटी समभागांचा समावेश आहे. १९६८०० इक्विटी समभाग मार्केट मेकर्ससाठी आणि ३६७२००० इक्विटी समभाग सर्व गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवण्यात येतील.

भांडवल उभारणीसाठी आयपीओ

धोरणात्मक गुंतवणूक व अधिग्रहणे, उपकंपन्यांमध्ये गुंतवणूक तसेच खेळत्या भांडवलाशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी सिस्टॅंगो टेक्नॉलॉजीज हा आयपीओ सुरु करत आहे. याचा बिड लॉट १६०० चा आहे. ऑफरच्या अटी व शर्तींनुसार, नेट ऑफरपैकी ५०% हे पात्र इन्स्टिट्यूशनल खरेदीदारांसाठी, १५% एचएनआय आणि एनआयआयसाठी व उरलेले ३५% रिटेल गुंतवणूकदारांसाठी असतील.

सिस्टॅंगो टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे बहुतांश उत्पन्न निर्यात विक्रीमधून येते. आपल्या उपकंपन्यांच्या मदतीने ही कंपनी दहा वेगवेगळ्या देशांमधील अनेक वेगवेगळ्या ग्राहकांना सेवा प्रदान करते. कंपनीचे मुख्यालय इंदोर स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये असून त्यामुळे सेझ नियमांप्रमाणे टॅक्स लाभ देखील कंपनीला मिळतात. युकेमध्ये आयसिस्टॅंगो टेक्नॉलॉजीज आणि यूएसएमधील सिस्टॅंगो एलएलसी या संपूर्ण मालकीच्या उपकंपन्या या कंपनीच्या व्यवसाय संचालनात सहायक भूमिका निभावतात.

विभाग