मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : पेट्रोल डिझेल दराचे नवे अपडेट्स, आज तुमच्या शहरांतील किंमती अशा आहेत!

Petrol Diesel price today : पेट्रोल डिझेल दराचे नवे अपडेट्स, आज तुमच्या शहरांतील किंमती अशा आहेत!

Mar 13, 2023, 07:00 AM IST

    • Petrol Diesel price today 13 March 2023 : खनिज तेलाच्या किमतीत झालेल्या बदलाचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. १३ मार्च रोजीही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत.
petrol pump HT

Petrol Diesel price today 13 March 2023 : खनिज तेलाच्या किमतीत झालेल्या बदलाचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. १३ मार्च रोजीही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत.

    • Petrol Diesel price today 13 March 2023 : खनिज तेलाच्या किमतीत झालेल्या बदलाचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. १३ मार्च रोजीही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत.

Petrol Diesel price today 13 March 2023 : आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किंमतींमध्ये सतत घसरण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर दररोजप्रमाणे तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

Ola layoffs : 'ओला' करणार १० टक्के कर्मचारी कपात! सीईओ हेमंत बक्षी यांनी दिला राजीनामा

गेल्या काही दिवसांपासून खनिज तेलाच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. देशातील तेल विपणन कंपन्यांनी आज भारतातील विविध शहरांसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. खनिज तेलाच्या किमतीत झालेल्या बदलाचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. १३ मार्च रोजीही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत.

सकाळी सहा वाजता अपडेट

देशातील तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई, दिल्ली, कोलकातासह देशातील प्रमुख महानगरांतील पेट्रोल डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत.

देशातील प्रमुख महानगरांतील पेट्रोल डिझेलच्या किंमती

देशातील चार प्रमुख महानगरांतील पेट्रोल डिझेलच्या दरातही फारसा बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर आहे.मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९२.२७ रुपये प्रति लिटर आहे.

इतर शहरांतील आजचे दर 

शहरपेट्रोलडिझेल 
लखनऊ९६.५७ ८९.७६
नोएडा९६.७९८९.९६
गुरुग्राम९७.१८९०,०५
चंडीगढ़९६.२०८४.२६
पटना१०७.२४९४.०४
बेंगलुरु१०१.९४८७.८९

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

विभाग