मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Patanjali Foods : पतंजलीचे शेअर्स झाले फ्रीज, या कारणासाठी शेअर बाजाराने केली कारवाई

Patanjali Foods : पतंजलीचे शेअर्स झाले फ्रीज, या कारणासाठी शेअर बाजाराने केली कारवाई

Mar 16, 2023, 02:08 PM IST

    • Patanjali Foods : पतंजली फूड्स कंपनी निर्धारित वेळेत किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंगचे निकष पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली आहे.
Patanjali Shares HT

Patanjali Foods : पतंजली फूड्स कंपनी निर्धारित वेळेत किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंगचे निकष पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली आहे.

    • Patanjali Foods : पतंजली फूड्स कंपनी निर्धारित वेळेत किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंगचे निकष पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली आहे.

Patanjali Foods : शेअर बाजाराने पतंजली फूड्स लिमिटेडच्या प्रवर्तकाचे २९२.५ दशलक्ष शेअर्स गोठवले आहेत. शेअर बाजारानुसार, पतंजली फूडच्या प्रवर्तकाचे शेअर्स निर्धारित वेळेत किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंगच्या नियमांचे पालन न केल्यामुळे गोठवण्यात आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

Ola layoffs : 'ओला' करणार १० टक्के कर्मचारी कपात! सीईओ हेमंत बक्षी यांनी दिला राजीनामा

Flipkart Sale: फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलची घोषणा; स्मार्टफोन, टीव्हीसह 'या' वस्तूंवर मिळणार तगडं डिस्काऊंट

Bank Holiday may 2024 : मे महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार?; पाहा बँक हॉलिडेची यादी

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्सने प्रवर्तक समूहाचे २९२ दशलक्ष शेअर्स गोठवले आहेत. पतंजली फूड्स कंपनी निर्धारित वेळेत किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंगचे निकष पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली आहे. सेबीच्या नियमांनुसार, कोणत्याही सूचीबद्ध कंपनीमध्ये किमान २५% सार्वजनिक शेअरहोल्डिंग असणे आवश्यक आहे.

शेअर बाजाराने पतंजली फूड्सचे ८१.८२% शेअर्स गोठवले आहेत. पतंजली फूड्समध्ये प्रवर्तक आणि समूह कंपन्यांचा सुमारे ८१% हिस्सा आहे. बुधवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत पतंजली फूडने सांगितले की, बीएसई आणि एनएसईकडून १४ मार्च रोजी या संदर्भात ईमेल प्राप्त झाला आहे.

BSE आणि NSE च्या म्हणण्यानुसार, पतंजली फूड्सचे २१ प्रवर्तक संस्थांचे शेअर्स गोठवण्यात आले आहेत. पतंजली आयुर्वेद ही पतंजली फूड्समधील ३९ टक्क्यांहून अधिक समभागांसह सर्वात मोठी शेअरहोल्डर आहे. याशिवाय आचार्य बालकृष्ण आणि इतर प्रवर्तकांची पतंजली फूड्समध्ये मोठी होल्डिंग आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की २१ प्रवर्तक संस्थांचे शेअर्स गोठवण्यात आले आहेत.

शेअर्सचा ट्रेंड

बुधवारी पतंजली फूड्सचा शेअर एनएसईवर १.३ टक्क्यांनी वाढून ९६४.४० रुपयांवर बंद झाला. पतंजली फूड्सचे शेअर्स या वर्षात आतापर्यंत १९ टक्क्यांनी घसरले आहेत.

पतंजली फूड्सचे शेअर्सनी गुरुवारी ४ टक्क्यांहून अधिक कमजोरी नोंदवली. ते अंदाजे ९२४ रुपयांवर ट्रेड करत होते. गेल्या ५ दिवसांत पतंजली फूड्सचे शेअर्स ९८२ रुपयांवरुन ९२४ रुपयांपर्यंत घसरले आहेत. तर गेल्या १ महिन्यात १४ रुपयांनी घसरले आहेत. गेल्या ६ महिन्यांत या शेअर्समुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. १६ सप्टेंबर रोजी पतंजली फूड्सचे शेअर्स १३२७ रुपयांवर होते, जे आता ३० टक्क्यांहून अधिक घसरून ९२४ रुपयांवर व्यवहार करत आहेत.

विभाग