मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mamaearth IPO : मामाअर्थच्या आयपीओचा प्लान बॅकफूटवर, कंपनीने का घेतला असा निर्णय, पहा

Mamaearth IPO : मामाअर्थच्या आयपीओचा प्लान बॅकफूटवर, कंपनीने का घेतला असा निर्णय, पहा

Mar 28, 2023, 08:31 AM IST

  • Mamaearth IPO : स्किनकेअर ब्रँड मामाअर्थची पालक कंपनी होनासा कन्झ्युमर कंपनीने ३ अब्ज डाॅलर्स मूल्यासह २० ते ३० कोटी डाॅलर्सचा निधी उभारणीची योजना आखली होती.

mamaearth IPO HT

Mamaearth IPO : स्किनकेअर ब्रँड मामाअर्थची पालक कंपनी होनासा कन्झ्युमर कंपनीने ३ अब्ज डाॅलर्स मूल्यासह २० ते ३० कोटी डाॅलर्सचा निधी उभारणीची योजना आखली होती.

  • Mamaearth IPO : स्किनकेअर ब्रँड मामाअर्थची पालक कंपनी होनासा कन्झ्युमर कंपनीने ३ अब्ज डाॅलर्स मूल्यासह २० ते ३० कोटी डाॅलर्सचा निधी उभारणीची योजना आखली होती.

Mamaearth IPO : भारतीय स्किन केअर स्टार्टअप मामाअर्थने शेअरल बाजारातील कमजोर भावना लक्षात घेऊन आयपीओ आणण्याची आपली योजना तूर्तास रद्द केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

नेमकं कारण काय

मामाअर्थची पालक कंपनी होनासा कन्झ्युमर लिमिटेडने डिसेंबरमध्ये आयपीओसाठी दस्तावेज सेबीकडे सादर केले होते. कंपनीने नवे शेअर्स जारी केले आणि ओएफएसद्वारे २० ते ३० कोटी डाॅलर्स निधी उभारणीची योजना आखली होती. कंपनीने तीन अब्ज डाॅलर्स व्हॅल्यूएशनसह आयपीओ आणण्याची योजना बनवली होती.

कंपनीने आजमावली ही रणनिती

सेक्विया कॅपिटल आणि बेल्जियमची सोफिना कंपन्यांनी गुंतवणूक केलेली मामाअर्थ सध्या 'थांबा आणि पहा' धोरणावर काम करत आहे. बँकांच्या आर्थिक आरोग्याशी संबंधित चिंतेमुळे जगभरातील शेअर बाजारातील उच्च अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, कंपनीने आपली आयपीओ बाजारात उतरवण्याची योजना पुढे ढकलली आहे.

कंपनीसंदर्भातील महत्त्वाच्या बाबी

२०१६ मध्ये वरुण आणि गझल अलघ यांनी स्थापन केलेली ममाअर्थ ही भारतातील झपाट्याने वाढणारी सौंदर्य आणि पर्सनल केअर बाजारपेठेतील कंपनी आहे. २०२६ पर्यंत ही बाजारपेठ ३० अब्ज डॉलरची असेल असा अंदाज आहे. कंपनीच्या आयपीओ दस्तऐवजानुसार, भारतातील सौंदर्य बाजारपेठ वार्षिक १२ टक्के दराने वाढत आहे. जानेवारी २०२२ मध्ये कंपनीचे मूल्यांकन १.२ अब्ज डाॅलर्स इतके होते.

कंपनीच्या आयपीओचे भवितव्य

राॅयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीची योजना आता लिस्टिंगची आहे. पण कंपनी अजून काही दिवसांनी ही योजना अस्तित्वात आणेल, असा अंदाज आहे. कंपनी बाजारातील स्थितीचे पुनरावलोकन करण्याची शक्यता आहे. सेंटिमेट्समध्ये सुधारणा झाल्यानंतर सर्वसाधारणपणे आँक्टोबरपासून मार्केटिंग प्रोसेस सुरु करण्याची शक्यता आहे. दरम्यान या कंपनीत अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनीही आपला हिस्सा विकला आहे.

विभाग