मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Income tax filing : जुनी की नवी आयकर प्रणालीची निवड करा अन्यथा असा कापला जाईल TDS

Income tax filing : जुनी की नवी आयकर प्रणालीची निवड करा अन्यथा असा कापला जाईल TDS

Apr 15, 2023, 10:57 AM IST

    • Income tax filing : कर्मचाऱ्यांनी निवडलेल्या कर प्रणालीवर आधारित कंपनी त्याच्या पगाराच्या उत्पन्नातून टीडीएस कापून घेईल. कर्मचार्‍याने कर प्रणालीबद्दल माहिती न दिल्यास नवीन कर प्रणालीच्या आधारे टीडीएस कापला जाईल.
TAX HT

Income tax filing : कर्मचाऱ्यांनी निवडलेल्या कर प्रणालीवर आधारित कंपनी त्याच्या पगाराच्या उत्पन्नातून टीडीएस कापून घेईल. कर्मचार्‍याने कर प्रणालीबद्दल माहिती न दिल्यास नवीन कर प्रणालीच्या आधारे टीडीएस कापला जाईल.

    • Income tax filing : कर्मचाऱ्यांनी निवडलेल्या कर प्रणालीवर आधारित कंपनी त्याच्या पगाराच्या उत्पन्नातून टीडीएस कापून घेईल. कर्मचार्‍याने कर प्रणालीबद्दल माहिती न दिल्यास नवीन कर प्रणालीच्या आधारे टीडीएस कापला जाईल.

Income tax filing : नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. यासोबतच आयकराशी संबंधित नवे नियमही लागू झाले आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी सरकारने नवीन प्राप्तिकर प्रणाली अंतर्गत स्लॅब बदलले आहे. नवीन कर व्यवस्था आकर्षक बनवण्यासाठी त्यात काही फायदेही जोडण्यात आले आहेत. आता नव्या करप्रणालीचा अवलंब करून आयकर भरणाऱ्यांनाही स्टँडर्ड डिडक्शनचा TDS लाभ दिला जाणार आहे. तसेच ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर भरावा लागणार नाही. तुम्ही नोकरी करत असाल, तर या महिन्यापासून तुम्ही नवीन कर प्रणालीचा अवलंब करून आयकर भरणार की जुन्या पद्धतीद्वारे करणार हे तुमच्या कंपनीला हे सांगणे आवश्यक आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याच्या कंपनीला कर प्रणालीबद्दल माहिती देणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्याने निवडलेली कर व्यवस्था त्याच्या पगाराच्या उत्पन्नातून किती कर (TDS) कापला जाईल हे ठरवेल. आर्थिक वर्ष २०२३-२४ पासून, नवीन कर व्यवस्था डीफॉल्ट पर्याय बनली आहे. म्हणून, जर तुम्ही काम करत असलेल्या कंपनीला जूनी की नवी करप्रणाली निवडली आहे याची माहिती दिली नाही तर नव्या करप्रणालीअंतर्गत टीडीएस कापला जाईल.

पगारदार व्यक्तीला जुन्या आणि नवीन कर प्रणालीमध्ये निवड करावी लागेल. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) च्या १३ एप्रिल २०२० च्या परिपत्रकानुसार, पगारदार व्यक्ती पगारावरील TDS साठी दोनपैकी एक निवडू शकतो.

योग्य कर नियोजन न केल्यामुळे पगाराच्या उत्पन्नापेक्षा टीडीएस जास्त कापला जाईल आणि तुमच्या हातात येणारा पगारही कमी होईल. म्हणूनच तुम्ही आता कर व्यवस्था ठरवली पाहिजे. जर तुमच्या पगाराच्या उत्पन्नातून वास्तविक कर दायित्वापेक्षा जास्त TDS कापला गेला तर तुमचे नुकसान होईल. मग तुम्हाला रिफंडची वाट पाहावी लागेल. जोपर्यंत आयकर विभाग आयटीआर फॉर्मवर प्रक्रिया करत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.

विभाग