मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Explained : पॅन कार्डवर असणाऱ्या १० अंकी क्रमांकाचा अर्थ काय? ते काय दर्शवतात?

Explained : पॅन कार्डवर असणाऱ्या १० अंकी क्रमांकाचा अर्थ काय? ते काय दर्शवतात?

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 13, 2023 11:49 AM IST

10 digits mentioned in the PAN card : कोणत्याही पॅन कार्डमध्ये प्रविष्ट केलेल्या १० क्रमांकांपैकी पहिले तीन क्रमांक वर्णमालानुसार असतात. आयकर विभागातर्फे पॅन क्रमांक जारी करण्यासाठी विशेष प्रक्रिया वापरली जाते. तुमच्या पॅन कार्डवर अससेले १० क्रमांक हे अक्षरे आणि संख्यात्मक अंकांचे संयोजन आहेत.

Pan card HT
Pan card HT

Pan Card 10 Digit : पॅन कार्ड हे आपल्या ओळखीच्या सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. पॅनकार्डशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार करता येत नाहीत. बँक खाते उघडण्यापासून ते डिमॅट खात्यापर्यंत प्रत्येक व्यवहारामध्ये ते आवश्यक आहे. तुमचं पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक असणंही आवश्यक आहे. आपली बरीचशी महत्त्वाची माहिती पॅन कार्डवर नोंदवली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का पॅन कार्डमध्ये नमूद केलेल्या १० अंकांचा अर्थ काय आणि हे पॅन तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे?

पॅनमध्ये Pan card क्रमांक आणि अल्फाबेट्सचे संयोजन असते

कोणत्याही पॅन कार्डमध्ये प्रविष्ट केलेल्या १० क्रमांकांपैकी पहिले तीन अक्षरे वर्णमालानुसार असतात. आयकर विभाग पॅन क्रमांक जारी करण्यासाठी विशेष प्रक्रिया वापरते. तुमच्या पॅन कार्डवर असलेले १० क्रमांक हे अक्षरे आणि संख्यात्मक अंकांचे संयोजन आहेत. वर्णमाला मालिकेत, AAA ते ZZZ पर्यंत कोणतीही तीन अक्षरी मालिका तुमच्या पॅन कार्डवर टाकली जाऊ शकते. पॅन कार्डमधील पहिली पाच अक्षरे नेहमी अक्षरे असतात आणि पुढील चार अक्षरे संख्या असतात आणि नंतर शेवटी ती एका अक्षराने संपते.

पॅन कार्डवरील अक्षरे काय दर्शवतात? 1o digits on pan card

तुमच्‍या पॅन कार्डमध्‍ये असलेली चौथी वर्णमाला आयकर विभागाच्या नजरेत तुम्‍ही काय आहात (नोकरदार अथवा व्यावसायिक) याचे द्योतक आहे. तुम्ही वैयक्तिक करदाते असाल तर तुमच्या पॅनकार्डचा चौथी वर्णमाला 'पी' असेल. त्याचप्रमाणे प्रत्येक क्रमांकाचा वेगळा अर्थ आहे. पॅन वर एफ लिहिलेले असेल, तर तो क्रमांक एखाद्या फर्मचा असल्याचे संकेत आहे. जर टी असेल तर ते ट्रस्टचे पॅनकार्ड असल्याचे ओळखावे तर जी असेल तर गव्हर्नमेंट असे सुचित करते.

आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे

पॅन कार्डवर टाकलेले पाचवे अक्षर हे आडनावाचे पहिले अक्षर आहे. समजा एखाद्याचे नाव रोहन कुमार असेल तर पाचवे अक्षर के असते. शेवटी एक वर्णमाला आहे. कोणत्याही व्यक्तीसाठी आर्थिक कामासाठी पॅनकार्ड अत्यंत महत्त्वाचे असते. पॅनकार्डवर टाकलेले क्रमांक खूप महत्त्वाचे असतात. म्हणूनच बँका किंवा सरकारी एजन्सी त्यांना कोणाशीही शेअर न करण्याचा सल्ला देतात.

आधार पॅन लिंक करण्याची मुदत Aadhar Pan link

सरकारने आधाराशी पॅन संलग्न करण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढवली आहे. याचाच अर्थ तुम्ही या मुदतीच्या आत आधार पॅन संलग्न करु शकतात. त्यानंतर तुम्हाला १००० रुपये लेट फीस भरावी लागेल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग