मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today : सोने चांदीच्या किंमतींमध्ये पुन्हा उसळी, शुद्ध सोने दरात ६०० रुपयांची वाढ

Gold Silver Price Today : सोने चांदीच्या किंमतींमध्ये पुन्हा उसळी, शुद्ध सोने दरात ६०० रुपयांची वाढ

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 15, 2023 07:57 AM IST

Gold Silver price today 15 April 2023 : आगामी लग्नसराईच्या निमित्ताने सोने खरेदीसाठी सराफा बाजारात जाणार असाल तर त्यापूर्वी आजचे सोने चांदीचे दर येथे पहा. आज दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा चांगलीच वाढ झाली आहे.

Gold Silver HT
Gold Silver HT

Gold Silver price today 15 April 2023 : आज सराफा बाजारात सोने चांदीच्या किंमतीत चांगलीच वाढ झाली आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

आयबीजेएच्या संकेतस्थळानुसार, आज २४ कॅरेटसाठीचे दर अंदाजे ६१९५० रुपये प्रती तोळाच्या घरात आहेत. काल हा दर ६१३५० रुपये होता. कालच्या तुलनेत किंमती आज ६०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

आज २२ कॅरेटसाठी तोळा सोन्याची किंमत ५६८०० रुपये आहे. काल हे दर ५६२५० रुपये होते. कालच्या तुलनेत त्यात ५५० रुपयांची वाढ झाली आहे.

दरम्यान, आज चांदीच्या किंमती ७९६०० रुपये प्रति किलोंच्या घरात आहेत. काल त्यात अंदाजे ७८००० रुपये आहेत.कालच्या तुलनेत त्यात आज किंमतीत १६०० रुपयांची वाढ झाली आहे.

दरवाढीमागचे कारण

जागतिक पातळीवरील मध्यवर्ती बँकांनी सोने खरेदीकडे कल वाढवला आहे. परिणामी, सोने चांदीच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात फरक दिसून येत आहे.

सोने चांदीचे दर असे निश्चित केले जातात

भारतातील सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. मात्र, ही मध्यवर्ती संरचना आहे. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेता दागिन्यांमध्ये मेकिंग चार्जेस आकारून त्याची विक्री करतात.

एसएमएसवर जाणून घ्या सोने चांदीचे दर

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

WhatsApp channel

विभाग