मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today : आज या कारणामुळे वाढले सोने चांदीचे दर, पाहा आजच्या लेटेस्ट किंमती

Gold Silver Price Today : आज या कारणामुळे वाढले सोने चांदीचे दर, पाहा आजच्या लेटेस्ट किंमती

May 31, 2023, 08:36 AM IST

    • Gold Silver price today 31 May 2023 : आज सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात वाढ झाली आहे. अचानक झालेल्या दरवाढीमागचे कारण जाणून घ्या.
Gold silver HT

Gold Silver price today 31 May 2023 : आज सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात वाढ झाली आहे. अचानक झालेल्या दरवाढीमागचे कारण जाणून घ्या.

    • Gold Silver price today 31 May 2023 : आज सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात वाढ झाली आहे. अचानक झालेल्या दरवाढीमागचे कारण जाणून घ्या.

Gold Silver price today 31 May 2023 : इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, मंगळवारी संध्याकाळी सोन्याचा भाव ६०,४०२ रुपये होता. सकाळी हा दर ५९९८१ रुपये होता. त्यामुळे आज सकाळ ते संध्याकाळ दरम्यान सोन्याच्या दरात ४२१ रुपयांची वाढ झाली आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Export duty on onion : कांद्याच्या संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४० टक्के निर्यात शुल्क लागू

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

दुसरीकडे, मागील व्यवहाराच्या दिवशी सोने ६००१२ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले होते. अशाप्रकारे मागील व्यापार दिवसाच्या तुलनेत तो प्रति १० ग्रॅम ३९० रुपयांच्या वाढीसह बंद झाला आहे.

चांदीचे दर

याशिवाय आज चांदीचा दर ७०८६१ रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला. मंगळवारी सकाळी हा दर ७०३२३ रुपये प्रति किलोच्या पातळीवर उघडला. त्यामुळे सकाळ ते संध्याकाळ दरम्यान चांदीच्या दरात ५३८ रुपयांची वाढ झाली आहे. तर शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा हा दर प्रतिकिलो ७०,७८२ रुपये होता. त्यामुळे कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात किलोमागे ७९ रुपयांची वाढ झाली.

असे चेक करा तुमच्या शहरांतील किंमती

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

विभाग