मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Credit Card ; ‘क्रेडिट’ म्हणता म्हणता सगळंच होईल 'डेबिट', क्रेडिट कार्डाची अशी घ्या काळजी !

Credit Card ; ‘क्रेडिट’ म्हणता म्हणता सगळंच होईल 'डेबिट', क्रेडिट कार्डाची अशी घ्या काळजी !

Jan 25, 2023, 04:12 PM IST

    • Credit Card ; क्रेडिट कार्डाच्या नुकसानीसंदर्भात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला माहित नसतात. अशाच काही बाबी आज आपण जाणून घेऊया.
credit card HT

Credit Card ; क्रेडिट कार्डाच्या नुकसानीसंदर्भात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला माहित नसतात. अशाच काही बाबी आज आपण जाणून घेऊया.

    • Credit Card ; क्रेडिट कार्डाच्या नुकसानीसंदर्भात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला माहित नसतात. अशाच काही बाबी आज आपण जाणून घेऊया.

Credit Card :  खिशात दमडी नसतानाही पैशाची तजवीज कऱण्यासाठी क्रेडिट कार्ड अनेकदा वरदान ठरतं. पण त्याचे असे अनेक तोटे आहेत, जे तुम्हाला मोठ्या कर्जाच्या जाळ्यात अडकवू शकतात. त्याचा विचारपूर्वक वापर केला नाही तर मोठी समस्या उद्भवू शकते. क्रेडिट कार्डचे अनेक तोटे आहेत, त्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता.

ट्रेंडिंग न्यूज

Export duty on onion : कांद्याच्या संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४० टक्के निर्यात शुल्क लागू

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका

क्रेडिट कार्डशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात आणि बँका त्याबद्दल जास्त माहिती देत ​​नाहीत. यामध्ये क्रेडिट कार्डचे उशीरा पेमेंट केल्यावर जास्त व्याजदर, पेमेंट न केल्याने खाते ब्लॉक, प्रचंड कर्जाचा डोंगर अशा अनेक समस्या असू शकतात. अशा परिस्थितीत या समस्यांना तोंड देण्यासाठी तुम्ही काही खास उपाय करू शकता.

४० ते ५० दिवसात पेमेंट करा

क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी ४० ते ५० दिवसांचा कालावधी दिला जातो. या कालावधीत पेमेंट केले नाही तर तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागते. बँक किंवा क्रेडिट कार्ड जारी करणारी संस्था तुमच्याकडून ३० ते ३६ टक्के व्याजदर आकारते. अशा परिस्थितीत, तुम्ही जे पैसे मोफत देणार होतात, त्यावर तुम्हाला अधिक शुल्क भरावे लागते.

बँक खाते होईल ब्लाँक

जर तुमचे बचत खाते आणि क्रेडिट कार्डाचे खाते एकच आहे तर अडचणीच्या वेळी पेमेंट वेळेवर न केल्यामुळे ते खाते ब्लाँक होऊ शकते.खाते ब्लाँक झाल्याने पैसे काढता येत नाहीत. २ ते ३ महिने पेमेंट न भरल्यानंतर खाते ब्लाॅक केले जाते. पेमेट न केल्याने सिबिल स्कोअरही खराब होऊ शकतो.

विभाग