मराठी बातम्या  /  बिझनेस  /  E rupees : रोख रकमेला मिळाला पर्याय, असं असेल ‘ई रुपया’चं गणित

E rupees : रोख रकमेला मिळाला पर्याय, असं असेल ‘ई रुपया’चं गणित

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Dec 02, 2022 01:00 PM IST

E rupees : रिझर्व्ह बॅकेनुसार, ई रुपया डिजीटल टोकनवर आधारित असणार आहे. त्याचे मूल्य बँक नोटेशी समान असणार आहे. ई रुपयाला पेपर नोटेप्रमाणेच २०००, १०००,५० रुपये आणि इतर डिनाँमिनेशनमध्ये जारी केले जाणार आहे.

E rupees HT
E rupees HT

E Rupees : देशात गुरुवाती रिझर्व्ह बॅकेकडून रिटेल क्षेत्रासाठी डिजीटल रुपयाचे प्रायोगिक तत्वावर परिक्षण करण्यात आले. देशातील काही प्रमुख निवडक शहरांतून चार बॅकांकडून १.७१ कोटी रुपये मूल्याच्या डिजीटल रुपयाची मागणी केली होती. मागणीनुसार, डिजीटल रुपया आरबीआरकडून जारी करण्यात आला होता.

यासंदर्भातील निगडित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही वर्षात वाढत्या मागणीनुसार पुरवठ्यात वाढ करणअयात येईल. सध्या मध्यवर्ती बॅकेने डिजीटल करन्सी दिल्ली, मुंबई, बंगळूरु, आणि भूवनेश्वरमध्ये दाखल केले आहे. या प्रायोगिक प्रकल्पामध्ये भारतीय स्टेट बॅक, आयसीआयसीआय बॅक, आयडीएफसी बॅक आणि येस बॅक सहभागी आहेत.

कसा असेल ई रुपया

आरबीआयच्या माहितीनुसार, ई रुपया डिजीटल टोकन आधारित असणार आहे. ही करन्सी केवळ रिझर्व्ह बॅकच जाहीर करु शकते. त्याचे मूल्य बॅक नोटांप्रमाणेच समान असणार आहे. त्याला पेपर नोटेप्रमाणेच २०००, ५००,२००,१००,५० रुपयांसह इतर डिनाॅमिनेशनमध्ये छापण्यात येणार आहे.

असे होणार व्यवहार

डिजीटल रुपया एका खास ई वाॅलेटमध्ये सुरक्षित राहणार आहे. या वाॅलेला बॅका जारी करतील. मात्र त्याचे संपूर्ण नियंत्रण रिझर्व्ह बॅक करेल. याद्वारे आता ग्राहक व्यक्ती ते व्यक्ती (पी२पी) आणि व्यक्ती ते मर्चंट (पीटूएम) असा व्यवहार करु शकतील. याचाच अर्थ कोणत्याही दुकानदारांशी व्यवहार करता येईल. यूपीआय किंवा इतर आँनलाईन माध्यमातून ई रुपयाच्या वापरासाठी कमी शुल्क आकारले जाणार आहे.

यूपीआयपेक्षा ई रुपया वेगळा कसा ?

युपीआयच्या वापरासाठी तुमच्या खात्यात रोख रकम असणे आवश्यक आहे. तर डिजीटल रुपयामध्ये बॅक खात्यात रोख रक्कम असण्याची गरज नाही. तुम्ही सरळ ई वाॅलेटमधून ई रुपया मिळवू शकतात आणि त्याचा वापर करता येईल. हे एक ब्लाॅकचेन तंत्रज्ञानावर काम करेल. ज्यामुळे तुमची वैयक्तीक माहिती सुरक्षित राहिल आणि धोकाही कमी राहिल.

अर्थव्यवस्थेलाही फायदा

ई रुपयाच्या वापरामुळे मनी लाँन्ड्रिगसारख्या प्रश्नाला आळा बसेल. याशिवाय क्रिप्टोकरन्सीसारख्या प्रश्नावरही तोडगा निघू शकतो. ई रुपया रोख रकमेच्या रुपात काम करणार आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग