मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Amul Milk price Hike : महागाईचा धक्का, पुन्हा वाढले अमूल दूधाचे दर, प्रति लीटर २ रुपयांची वाढ

Amul Milk price Hike : महागाईचा धक्का, पुन्हा वाढले अमूल दूधाचे दर, प्रति लीटर २ रुपयांची वाढ

Apr 01, 2023, 06:38 PM IST

    • Amul Milk price Hike : नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्याने ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. देशातील सर्वात मोठी दूध कंपनी अमूलने आपल्या दुधाच्या दरात वाढ केली आहे.
Amul Milk HT

Amul Milk price Hike : नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्याने ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. देशातील सर्वात मोठी दूध कंपनी अमूलने आपल्या दुधाच्या दरात वाढ केली आहे.

    • Amul Milk price Hike : नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्याने ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. देशातील सर्वात मोठी दूध कंपनी अमूलने आपल्या दुधाच्या दरात वाढ केली आहे.

Amul Milk price Hike : दुधाच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता आधीच हैराण झाली आहे.आता देशातील सर्वात मोठी कंपनी अमूलने आपल्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेत ग्राहकांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. . कंपनीने गुजरातमध्ये दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर आजपासून म्हणजेच १ एप्रिल २०२३ पासून लागू झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Export duty on onion : कांद्याच्या संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४० टक्के निर्यात शुल्क लागू

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

इतक्या रुपयांची दरवाढ

या वाढीनंतर गुजरातमध्ये दुधाचे दर ३ ते ४ टक्क्यांनी महागले आहेत. गुजरात कॉर्पोरेशन मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने (GCMMF ) ने अमूलच्या दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. अमूलच्या सर्व दूधाच्या प्रकारावर वाढ लागू करण्यात आली आहे. या वाढीनंतर अमूल गोल्ड, अमूल शक्ती आणि अमूल फ्रेश दुधाच्या वाणांमध्ये प्रतिलिटर २ रुपयांची वाढ झाली आहे.

सुधारित किंमती

या वाढीनंतर आता गुजरातमध्ये अर्धा लिटर दुधाला अमूल गोल्डसाठी ३२ रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर अमूल फ्रेशच्या अर्ध्या लिटर पॅकेटसाठी २६ रुपये आणि अमूल शक्तीसाठी २९ रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर एक लिटर अमूल गोल्डसाठी ६४ रुपये, अमूल शक्तीसाठी ५८ रुपये आणि अमूल जटासाठी ५२ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. यापूर्वी संघटनेने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये गुजरातमध्ये दुधाच्या दरात वाढ केली होती.

दुधाचे भाव का वाढले

गुजरातमध्ये अमूल दुधाच्या दरात झालेल्या वाढीमागे गेल्या काही महिन्यांत दुधाच्या उत्पादनात आणि किमतीत वाढ झाल्याची माहिती कंपनीने एका निवेदनाद्वारे दिली आहे. गेल्या काही महिन्यांत जनावरांच्या चाऱ्याच्या दरात १३ ते १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या महागाईत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यानंतर आता कंपनीने राज्यातील दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अमूल हे गुजरातमधील स्थानिक उत्पादन आहे. त्यामुळे इथल्या दरवाढीचा अप्रत्यक्षरित्या परिणाम देशांतर्गत पातळीवरही होण्याची शक्यता आहे. अमूलने गेल्या काही महिन्यांत अनेकवेळा दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. अशा स्थितीत त्याचा परिणाम जनतेच्या खिशावर दिसून येत आहे.

विभाग