मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Amul Price Hike: दिवाळीच्या तोंडावरच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; अमूल दूध दरात वाढ

Amul Price Hike: दिवाळीच्या तोंडावरच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; अमूल दूध दरात वाढ

Oct 15, 2022, 11:36 AM IST

    • अमूलने  दिल्लीमध्ये दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ केवळ दिल्लीसाठी मर्यादित आहेत.
अमूल दूध दरात वाढ

अमूलने दिल्लीमध्ये दुधाच्या किमतीत प्रति लिटर २रुपयांची वाढ केली आहे.ही दरवाढ केवळ दिल्लीसाठी मर्यादित आहेत.

    • अमूलने  दिल्लीमध्ये दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ केवळ दिल्लीसाठी मर्यादित आहेत.

Amul Price Hike: दिवाळीच्या तोंडावरच किरकोळ महागाईचा दर ७.४१ टक्क्यांवर पोहोचला असताना आता सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. देशातील सर्वाधिक दूध उत्पादक कंपनी अमूलने मागील सहा महिन्यात तिसऱ्यांदा दूधाचे दर वाढवले आहेत. अमूलने  दिल्लीमध्ये दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ केवळ दिल्लीसाठी मर्यादित आहेत. नव्या दरानुसार फुल क्रीम दुधाचे दर प्रतिलिटर ६१ रुपयांवरुन वाढून ६३ रुपये प्रति लिटर झाले आहे. यामुळे आधीच महागाईची झळा सोसत असलेल्या सर्वसामान्यांना आता दूर दरवाढीचा बुस्टर डोस बसला आहे. कारण दूध घरातील आवश्यक वस्तू आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

अमूल कंपनीने दुधाचे दर का वाढवले याबाबत कंपनीकडून काहीच स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. आता अन्य दूध उत्पादक कंपन्याही दूध दरात वाढ करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

महागाईमुळे सध्या जनावरांवर खूप खर्च होत आहे. त्यामुळे दूध उत्पादनाचा खर्चही सातत्याने वाढत आहे. याच कारणामुळे दूधाच्या दरावरही याचा परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमूल आणि मदर डेअरी या लोकप्रिय दुधाच्या ब्रँडने ऑगस्टमध्येही दुधाच्या दरात २ रुपये प्रति लिटरने वाढ केली होती. याआधी मार्चमध्येही दरात वाढ करण्यात आली होती. यापाठोपाठ आता पुन्हा एकदा अमूलने दूध दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. 

पुढील बातम्या