मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks to buy : स्वस्तात खऱेदी करा रिलायन्स, टाटा कन्झ्यूमरसह हे १४ स्टाॅक्स, येथे चेक करा लिस्ट

Stocks to buy : स्वस्तात खऱेदी करा रिलायन्स, टाटा कन्झ्यूमरसह हे १४ स्टाॅक्स, येथे चेक करा लिस्ट

Mar 15, 2023, 09:19 PM IST

    • Stocks to buy : रिलायन्स इंडस्ट्री, पेज इंडस्ट्री, सिप्ला, लाॅरेस लॅब्स, ग्लँड फार्मा, बायोकाॅन, क्राॅम्प्टन ग्रीव्ह्ज कन्झ्यूमर इलेक्ट्रिकल्स, मुथूट फायनान्स, एमओएफएस सारखे स्टाॅक्सनी गेल्या ५२ आठवड्यातील निचांकी पातळी गाठली आहे.
stocks to buy HT

Stocks to buy : रिलायन्स इंडस्ट्री, पेज इंडस्ट्री, सिप्ला, लाॅरेस लॅब्स, ग्लँड फार्मा, बायोकाॅन, क्राॅम्प्टन ग्रीव्ह्ज कन्झ्यूमर इलेक्ट्रिकल्स, मुथूट फायनान्स, एमओएफएस सारखे स्टाॅक्सनी गेल्या ५२ आठवड्यातील निचांकी पातळी गाठली आहे.

    • Stocks to buy : रिलायन्स इंडस्ट्री, पेज इंडस्ट्री, सिप्ला, लाॅरेस लॅब्स, ग्लँड फार्मा, बायोकाॅन, क्राॅम्प्टन ग्रीव्ह्ज कन्झ्यूमर इलेक्ट्रिकल्स, मुथूट फायनान्स, एमओएफएस सारखे स्टाॅक्सनी गेल्या ५२ आठवड्यातील निचांकी पातळी गाठली आहे.

Stocks to buy : लार्ज कॅप आणि मिडकॅप सेगमेंटमधील किमान १४ बड्या कंपन्यांच्या शेअर्सनी ५२ आठवड्यातील निचांकी पातळी गाठली आहे. आकडेवारीनुसार, रिलायन्स इंडस्ट्री, पेज इंडस्ट्री, सिप्ला, लाॅरेस लॅब्स, ग्लँड फार्मा, बायोकाॅन, क्राॅम्प्टन ग्रीव्ह्ज कन्झ्यूमर इलेक्ट्रिकल्स, मुथूट फायनान्स, मोतीलाल ओसवाल फायनान्स (एमओएफएस ), रिलॅक्सो फूटवेअर्स, इप्का लेबोरेटरीज, जिलेट इंडिया, बायर क्राॅपसायन्स आणि टाटा कन्झ्यूमरसारखे स्टाॅक्स ५२ आठवड्याच्या निचांकी पातळीवर पोहोचले आहेत. त्यामुळे हे स्टाॅक्स खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूक या क्वालिटी स्टाॅक्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करु शकतात. कारण हे स्टाॅक्स स्वस्त दरात उपलब्ध आहेत. वाढती महागाई, परकीय गुंतवणूकदारांची शेअर्स विक्री, सिलीकाॅन व्हॅली बँकेतील सध्याची डबघाईची स्थिती यामुळे शेअर बाजारात गेल्या दोन दिवसात निर्देशांकात मोठ्या फरकाचे चढ उतार दिसत आहेत. वार्षिक आधारावर निर्देशांकात १४ मार्चला ५ टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे.

मिडकॅप शेअर्समध्ये चांगली वाढ

मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अरविंद सिंह नंदा यांच्या म्हणण्यानुसार, गुंतवणूक आपल्या पोर्टफोलियोमध्ये अशा स्टाॅक्सची खरेदी करु शकतात. लार्ज कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची ही चांगली संधी आहे. कारण इतरवेळी उच्च मूल्य असलेले हे लार्ज कॅप शेअर्सचे मूल्य गेल्या दोन दिवसांत चांगलेच घसरले आहेत. त्यामुळे आगामी काळातही हे शेअर्स चांगला परतावा देतील अशी अपेक्षा आहे.

रेलिगेअर ब्रोकिंगच्या टेक्निकल विभागाचे व्हीपी अजीत मिश्रा म्हणाले की, सध्या ५२ आठवड्यांच्या निचांकी पातळीवर रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर्स खरेदी करण्याची ही चांगली संधी ठरु शकते.

शेअरखाननेही गेल्या महिन्यात ९३० रुपयांच्या टार्गेट प्राईससह रिलॅक्सो फूटवेअरसाठी बाय रेटिंग्ज दिली होती. तर बी अँड के सिक्यूरिटीज ३६३ रुपयांच्या टार्गेट प्राईससह क्राॅम्पटन ग्रीव्ह्ज कन्झ्यूमर इलेक्ट्रिकल्ससाठी बूलिश आहेत. अजीत मिश्राने शाॅर्ट टर्म ट्रेडिंगसाठी आयटीसी, एल अँड टी , महिंद्रा अँड महिंद्रा, अँक्सिस बँक, सन फार्मा, एनटीपीसी सारखे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

(डिस्‍क्‍लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

 

विभाग