Rahul Gandhi on Electoral bonds : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत इलेक्टोरल बाँडच्या मुद्द्यावर खुलासा केला आहे. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींची खिल्ली उडवली आहे. 'निवडणूक रोखे घेणाऱ्यांची नावं आणि तारीख पाहिली की सगळं सत्य समोर येतं. आधी बाँड घेतले, नंतर कंत्राट मिळालं किंवा कंपनी विरुद्धची सीबीआय चौकशी मागे घेण्यात आली. ही जगातील सर्वात मोठा खंडणी घोटाळा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याचे मास्टरमाईंड आहेत. नरेंद्र मोदी हे पकडले गेले आहेत. मुलाखत देताना त्यांच्या डोळ्यात पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल, असंही राहुल गांधी म्हणाले.