Latest raj thackeray Photos

<p>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मनसे महायुतीला पाठिंबा देत आहे, असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. मात्र, मोदींना पाठिंबा का हे सांगताना त्यांच्या बोलण्यात अनेक विरोधाभास दिसून आले. एकीकडे लाखो उद्योजक बाहेर गेल्याचं राज यांनी सांगितलं. दुसरीकडं त्यांनी महाराष्ट्रातून कररूपानं जाणारा पैसा महाराष्ट्रात येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रत्यक्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात जीएसटीच्या पैशासाठी झगडावं लागत होतं. याबद्दल ते काहीच बोलले नाहीत. त्यामुळं राज ठाकरे नेमकं काय बोलत अशी अवस्था अनेकांची झाली होती. त्याचं प्रतिबिंब सोशल मीडियात उमटलं आहे.</p>

Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेवर जोरदार टीका; सोशल मीडियात मीम्सचा महापूर

Thursday, April 11, 2024

<p>राज्यातील आज सर्वत्र गणेश चतुर्थीची उत्साह असून घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. त्याचबरोबर अनेक राजकीय नेत्यांच्या घरीही बाप्पा विराजमान झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानीही बासरीच्या मंगलमय सुरात बाप्पांचं आगमन झालं. राज ठाकरेंच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सहपत्निक राज ठाकरेंच्या घरी दाखल झाले होते.</p>

Ganesh Chaturthi : देवेंद्र फडणवीस सपत्नीक राज ठाकरेंच्या निवासस्थानी, गणपती बाप्पांचं घेतलं दर्शन, पाहा PHOTOS

Tuesday, September 19, 2023

MNS Dipotsav Program Mumbai : राज्यात भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांशी जवळीक वाढली आहे. त्यामुळं आता राज्यात शिंदे गट, भाजप आणि मनसे अशी महायुतीच्या शक्यता वर्तवल्या जात आहे.

PHOTOS : ठाकरेंच्या दीपोत्सवाला शिंदे-फडणवीसांची उपस्थिती; राज्यात पुन्हा नव्या महायुतीची नांदी?

Saturday, October 22, 2022

<p>राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला मशिदीवरील भोंग्याबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा पोरकटपणा असल्याचं म्हटलं होतं. तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना राज ठाकरे भाजपचा भोंगा असल्याचं म्हणाले होते. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यापासून सुरु झालेला हा भोंग्याचा विषय आता सोमय्यांवर हल्ला झाल्यानंतर दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.</p>

भोंग्यांचं राजकारण! गल्लीपासून दिल्लीपर्यंत…

Monday, April 25, 2022