Latest pune metro Photos

<p>पुणे मेट्रोमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक (१७ किमी) आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक (१६ किमी) असे ३३ किमी लांबीचे २ मार्ग आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक (७ किमी) आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक (५ किमी) मार्गिका सुरू करण्यात आल्या आहेत. &nbsp;</p>

Pune metro : पुणेकरांसाठी ऐतिहासिक क्षण! मेट्रो धावली मुठा नदीखालून; पाहा फोटो

Tuesday, February 6, 2024

<p>पुणे मेट्रोच्या PCMC ते स्वारगेट (१७ किमी) आणि वनाझ ते रामवाडी (१६ किमी) अश्या दोन मार्गिकाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. &nbsp;दोन्ही मार्गिका सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे एकमेकांना छेदतात आणि त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक एक महत्वाचे स्थानक म्हणून उभारण्यात येत आहे.&nbsp;</p>

Pune Metro : पुण्यातील 'हे' भुयारी मेट्रो स्टेशन नाही पाहिलं तर काय पाहिलं?

Wednesday, August 2, 2023

<p>पुणे मेट्रोची &nbsp;सिव्हिल कोर्ट स्थानक ते रुबी हॉल स्थानक मार्गाची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. ठीक ३.५० मिनिटांनी सिव्हिल कोर्ट स्थानक येथून मेट्रो रुबी हॉल कडे निघाली. &nbsp;ही रेल्वे ४.०७ मिनिटांनी रुबी हॉल स्थानकात पोहचली. &nbsp;</p>

Pune Metro : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे मेट्रो धावली रुबी हॉल मेट्रो स्थानकापर्यंत; चाचणी यशस्वी

Monday, March 27, 2023

<p>रेंज हिल कार डेपो ते रेंज हिल स्थानक अशी मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ५ वाजून १५ मिनिटांनी मेट्रो ही रेंज हिल डेपो इथून निघाली. ही गाडी ५ वाजून ३५ मिनिटांनी सुमारे १ किलो मीटरचे अंतर पार करून रेंज हिल स्थानकापर्यंत आली. ट्रेनची चाचणी नियोजित उद्दिष्टानुसार व वेळेवर पार पाडली. येत्या काही आठवड्यात रेंज हिल डेपो ते शिवाजीनगर भूमिगत स्थानक व सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे भूमिगत स्थानकापर्यंत मेट्रोची चाचणी घेण्यात येणार आहे.</p>

Pune Metro : पुणे मेट्रोची रेंजहील ते कार डेपो स्थानका पर्यन्तची चाचणी यशस्वी; लवकरच मार्ग होणार खुला

Tuesday, November 29, 2022

बाल दिनानिमित्त पुणे मेट्रो तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात  चित्रकला स्पर्धा, विविध खेळ आणि प्रश्नमंजुषा यांचा समावेश होता. या स्पर्धेतील  विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

Children's Day : बालदिनी पुणे मेट्रोची सफर; २२०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी लुटला आनंद; पाहा फोटो

Monday, November 14, 2022