Latest ashadhi wari 2022 Photos

चोपदाराने रिंगण लावल्यानंतर अश्वाने तीन फेर्‍या पूर्ण केल्या. विठ्ठल नामाच्या गजराने शाळेचा परिसर दुमदुमून गेला.

Pune: शाळेत प्रतिकात्मक रिंगण सोहळा, बाल वारकरी दंगले टाळ मृदंगाच्या गजरात

Saturday, July 9, 2022

आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी करावी असा मोह मराठी माणसाला नक्कीच होतो. टाळ मृदूंगाच्या गजरात बेधुंद होऊन नाचणारे वारकरी पाहिले की खरी तल्लीनता काय असते हे याची जाणीव होते. प्रचंड जनसमुदाय एका विठुरायाला भेटण्यासाठी कित्येक दिवसांची पायपीट करून पंढरीत दाखल होतो. मनात एकमेकांविषयी द्वेष भावना न ठेवता भेदभाव न मानता छोट्यामोठ्यांसमोर नतमस्तक होतात. ही सर्व वारकरी परंपरा महाराष्ट्राच्या मातीत रुजली आणि वाढली. वारकरी संप्रदायाचा हा वसा पुढे चालवणाऱ्यासाठी काही मराठमोळे कलाकार वारीत सहभागी होऊन त्यांची सेवा करताना दिसले. काहींनी वारकऱ्यांच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त केला तर काहींनी त्यांच्या थकलेल्या पायाला तेल लावून दिलं. पाहूया अशा काही कलाकारांचे फोटो.

पंढरीची वारी जयाची अधुरी! हरिनामाच्या गजरात दंग झाले 'हे' मराठमोळे कलाकार

Tuesday, June 28, 2022

नीरा नगरीत माऊलींचा पालखी सोहळा अकरा वाजता दाखल झाला. ग्रामपंचायत कार्यालया समोरील छत्रपती शिवाजी चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत ग्रामस्थांनी केले. यानंतर सोहळा नीरा नदिच्या काठावरील नयनरम्य विसावास्थळी विसावला.

Ashadhi palkhi 2022माऊली नामाच्या जयघोषात पादुकांना नीरा स्रान; पहा क्षणचित्रे

Tuesday, June 28, 2022

पुण्यातील गुरुवारचा मुक्काम आटोपल्यानंतरर ‘एवढा करा उपकार! देवा सांगा नमस्कार’ असे म्हणत शहरातील भक्तांनी पालखी सोहळ्याला साश्रू नयनांनी निरोप दिला.पालखी सोहळ्याने हरिनामाच्या गजरात हा घाट सायंकाळी ५ वाजता पार केला. रात्री ९ च्या सुमारास हा सोहळा सासवडला पोहचला. यावेळी सासवडकरांनी जल्लोषात या पालखी सोहळ्याचे स्वागत केले. (फोटो- प्रथम गोखले / हिंदुस्तान टाईम्स)

‘ज्ञानोबा माऊली तुकारामा’च्या गजराने दुमदुमाला दिवे घाट; पहा क्षणचित्रे

Saturday, June 25, 2022

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा संचेती पुलावरून पुण्यात दाखल झाला. यावेळी पालखीच्या दर्शनासाठी दोन्ही बाजुंनी नागकिरांनी केली होती.

पुण्यनगरीत जमली भक्तांची मांदियाळी; पहा क्षणचित्रे

Wednesday, June 22, 2022

भक्ती मार्गाचे दैवत श्री विठ्ठल भगवान पांडुरंगाचे दर्शन आणि वारीला जाण्यास माऊली मंदिरातील विना मंडपातून श्रींची पालखी मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास हरिनाम गजरात बाहेर पडली. यावर्षी प्रस्थानला लाखो वारकरी भाविकांची गर्दी झाल्याने प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. वारकरी,भाविकांचे उपस्थितीत श्रींचे पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवले.

लाखो वारक-यांच्या उपस्थितीत रंगला संत ज्ञानोबा माऊलींचा वैभवी पालखी प्रस्थान सोहळा

Tuesday, June 21, 2022

आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यातून भाविक वारकरी दाखल झाले आहेत. इंद्रायनीच्या काठ या भविकांमुळे गजबजून गेला आहे.

आळंदीत दिंड्यांचे आगमन; टाळ, मृदुंगाची दुकाने सजली, सर्वत्र हरिनामाचा गजर

Tuesday, June 21, 2022

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या ३३७ व्या पालखीने सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. दोन वर्षांनंतर हा पालखी सोहळा उत्साहात पार पडला आहे. वारक-यांनी याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवला.

Palkhi Sohala : भक्तीरसात न्हाहून निघाली संत तुकोबांची नगरी; पहा फोटो

Monday, June 20, 2022

देहू येथे आज आषाढी वारी सोहळ्यासाठी जवळपास ३९० दिड्यांचे आगमन झाले आहे. मोठ्या प्रमाणात वैष्णव देहुत दाखल झाले आहेत. आज संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोबत्त ते पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत

Palkhi Sohala देहूमध्ये वैष्णवांचा मेळा; भक्तीरसात न्हाली संत तुकोबारायांची नगरी

Monday, June 20, 2022