मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Harmanpreet kaur : हरमनप्रीतवर कोट्यवधींची बोली, मुंबई इंडियन्सची कॅप्टन बनणार

Harmanpreet kaur : हरमनप्रीतवर कोट्यवधींची बोली, मुंबई इंडियन्सची कॅप्टन बनणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 13, 2023 05:13 PM IST

WPL 2023 Auction Harmanpreet kaur mumbai indians : भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक असलेल्या हरमनप्रीतला १४७ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे.

Harmanpreet kaur mumbai indians
Harmanpreet kaur mumbai indians

WPL 2023 Auction News Updates in marathi : महिला प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचे ऑक्शन मुंबईत सुरू आहे. या ऑक्शनमध्ये भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिच्यावर सर्वाधिक बोली लागली. ती महिला प्रीमियर लीगची सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३.४० कोटी रूपयांना आपल्या ताफ्यात घेतले.

ट्रेंडिंग न्यूज

तर टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतले. ती मुंबईची कर्णधार बनू शकते. हरमनप्रीतला या लिलावात १.८० कोटी रुपयांना विकत घेण्यात आले आहे. हरमन ही टी-२० क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. तिची बेस प्राइस ५० लाख रुपये होती.

हरमनप्रीत कौर हिला १४७ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. यामध्ये हरमनने १०७ च्या स्ट्राईक रेट आणि २९५६ धावा केल्या आहेत. याशिवाय गोलंदाजीतही तिच्या नावावर ३२ बळी आहेत. हरमनप्रीत कौर ही मधल्या फळीतील धोकादायक फलंदाज आहे. या कारणास्तव, तिला खरेदी करण्यासाठी बराच काळ बोली चालू होती.

आरसीबीने तिला खरेदी करण्यासाठी पहिली बोली लावली होती. यानंतर दिल्ली कॅपिटल्सनेही यात उडी मारली. यादरम्यान मुंबई आणि दिल्ली यांच्यात संघर्ष झाला. शेवटी मुंबईने बाजी मारली. हरमनप्रीत कौरला खरेदी केल्याने मुंबईसाठी कर्णधाराचे टेन्शन मिटले आहे. हरमनप्रीतला कर्णधारपदाचा प्रदीर्घ अनुभव आहे. महिला आयपीएलमध्ये ती मुंबईची कर्णधार होणार हे निश्चित दिसत आहे. मुंबईच्या बाजूनेही लवकरच त्याची घोषणा होऊ शकते.

WhatsApp channel

संबंधित बातम्या