मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Video : किती अब्रू काढाल? हा दिवस बघण्यासाठी मेडल जिंकलं होतं का?; विनेश फोगाटचा काळीज पिळवटून टाकणारा सवाल

Video : किती अब्रू काढाल? हा दिवस बघण्यासाठी मेडल जिंकलं होतं का?; विनेश फोगाटचा काळीज पिळवटून टाकणारा सवाल

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 04, 2023 01:08 PM IST

Vinesh Phogat on Delhi Police : जंतरमंतरवर दिल्ली पोलिसांनी आंदोलक कुस्तीपटूंशी केलेल्या गैरवर्तनानंतर देशभरातील राजकीय वातावरण तापलं आहे. आंदोलक कुस्तीपटू विनेश फोगाट हिनं पदक परत करण्याची घोषणा केली आहे.

Vinesh Phogat
Vinesh Phogat

2023 Indian wrestlers' protest : कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार बृजभूषणशरण सिंह यांच्यावर कारवाईसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेलं कुस्तीपटूंचं आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. पोलिसांशी झटापट झाल्यानंतर कुस्तीपटू अधिकच आक्रमक झाले असून ऑलिम्पिकमध्ये देशासाठी जिंकलेली पदकं परत करण्याचा निर्णय विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी भारतीय महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात तक्रार करूनही सुरुवातीला पोलिसांनी ती घेतली नव्हती. त्या विरोधात कुस्तीपटू आंदोलनाला बसले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला खरा, मात्र पुढं कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळं कुस्तीपटूंनी आंदोलन सुरूच ठेवलं आहे.

Mohammed Shami: शामीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; वेश्यांसोबत संबंध ठेवल्याचा आरोप

बुधवारी रात्री झोपण्यासाठी पांघरूण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलक पैलवानांना पोलिसांनी धक्काबुक्की केली, असा आरोप विनेश फोगाट हिनं केला आहे. तसंच, कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या दिल्ली विद्यापीठाच्या तरुणींशीही पोलिसांनी गैरवर्तन केलं.

कॅमेऱ्यासमोर पोलिसांच्या मनमानीबद्दल बोलताना विनेश फोगाटला रडू कोसळले. ‘बृजभूषण इतके सगळे कांड करून घरात आरामात झोपला आहे. आम्हाला झोपण्यासाठी साधे कागदाचे पुठ्ठे घेऊ दिले जात नाहीत. पोलीस म्हणतात, झोपा नाहीतर मरा. अरे मारायचं असेल तर मारून टाका. मरायलाही तयार आहोत. किती अब्रू काढाल आमची? आम्ही आत्मसन्माची लढाई लढतोय आणि तुम्ही मुलीच्या छातीवर धक्के मारताय? हा दिवस बघण्यासाठी आम्ही देशासाठी मेडल जिंकलं होतं का? भविष्यात कुणीही देशासाठी मेडल आणू नये असं वाटतं. एवढी दुर्दशा करून टाकलीय आमची. अन्नही नाही घेतलं आम्ही अजून,’ असं सांगताना विनेश अक्षरश: ढसढसा रडली.

शरद पवार यांनी केला निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्ली पोलिसांच्या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. दिल्ली पोलीस शांततापूर्ण आंदोलक व तरुण विद्यार्थिनींशी करत असलेलं वर्तन अत्यंत चुकीचं आहे. मी याचा तीव्र निषेध करतो. देशाच्या गृहमंत्र्यांनी स्वत: तातडीनं यात लक्ष घालावं, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

WhatsApp channel

विभाग