मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli म्हणतो, प्रत्येकाला त्या तिघांची नावे कळायला हवीत, ज्यांच्यामुळे...

Virat Kohli म्हणतो, प्रत्येकाला त्या तिघांची नावे कळायला हवीत, ज्यांच्यामुळे...

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 16, 2023 07:23 PM IST

Virat Kohli Interview IND vs SL Match : विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतके झळकावली. या खेळीनंतर विराटने चाहत्यांना टीम इंडियाच्या खास त्रिकुटाची ओळख करून दिली आहे. विराटने आपल्या यशाचे श्रेय या तिघांना दिले आहे. यात एका परदेशी नावाचाही समावेश आहे.

Virat Kohli Interview
Virat Kohli Interview

तिसऱ्या वनडेत भारताने श्रीलंकेवर ३१७ धावांनी विजय मिळवला. वनडे इतिहासातील कोणत्याही संघाचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता. २००८ मध्ये त्यांनी आयर्लंडचा २९० धावांनी पराभव केला होता. त्याच वेळी, भारतीय संघाने यापूर्वी २००७ मध्ये बर्म्युडाला २५७ धावांनी धुळ चारली होती.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ५ गडी गमावून ३९० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ २२ षटकांत ७३ धावांत गारद झाला. या विजयासह भारताने श्रीलंकेला वनडे मालिकेत ३-० अशी धुळ चारली.

सामन्यानंतर शुभमनने घेतली विराटची मुलाखत

सामना संपल्यानंतर सलामीवीर शुभमन गिलने बीसीसीआय टीव्हीसाठी विराट कोहलीची मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान विराट कोहलीने पडद्याआडून संघासाठी योगदान देणाऱ्या भारतीय संघातील ३ नायकांची सर्वांना ओळख करून दिली. हे हिरो म्हणजे थ्रो-डाउन स्पेशलिस्ट रघु, नुवान आणि दया.

विराटने सांगितले की, “हे तिघे आपल्याला दररोज १४५-१५० किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकून सराव करून घेतात. यामुळे आपल्याला सामन्यासाठी सज्ज होण्यास मदत होते. आपल्या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणूनच प्रत्येकाने त्याचा चेहरा आणि नाव लक्षात ठेवले पाहिजे”.

पुढे बोलताना विराट म्हणाला की, “खरे सांगायचे तर हे लोक रोज सराव करून घेतात. आपल्या यशाचे बरेच श्रेय त्यांना जाते. त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्यामुळे माझ्या करिअरमध्ये मोठा फरक पडला आहे. या प्रकारापूर्वीचा सराव आणि आता मी जो क्रिकेटपटू आहे, त्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे”.

नुवान सेनेविरत्ने हा श्रीलंकेचा

नुवान सेनेविरत्ने डावखुरा थ्रो डाऊन विशेषज्ञ श्रीलंकेचा आहे. डावखुऱ्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी टीम इंडियाने त्याला २०१८ मध्ये नियुक्त केले होते. दुसरीकडे, कर्नाटकातील रघू म्हणजेच डी राघवेंद्र जवळपास १० वर्षांपासून संघासोबत आहे. तर बंगालचा दयानंद गरानी हा संघातील तिसरा थ्रो-डाउन स्पेशालिस्ट आहे.

WhatsApp channel