मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T-20 World Cup पूर्वी आफ्रिका-ऑस्ट्रेलिया भारतात येणार, पाहा संपूर्ण शेड्यूल

T-20 World Cup पूर्वी आफ्रिका-ऑस्ट्रेलिया भारतात येणार, पाहा संपूर्ण शेड्यूल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 03, 2022 09:10 PM IST

टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने टी-20 मालिकेसाठी दोन मोठ्या संघांना पाचारण केले आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहा टी-20 सामने खेळवले जाणार आहेत.

T-20 World Cup
T-20 World Cup

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. टीम इंडिया आपल्या मायदेशातील मालिकेची सुरुवात कांगारूंविरुद्धच्या टी-20 मालिकेने करणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. या कालावधीत एकूण ९ सामने होतील. टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने टी-20 मालिकेसाठी दोन मोठ्या संघांना पाचारण केले आहे.

सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका (India vs Australia)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला T20 २० सप्टेंबरला मोहालीत, दुसरा T20 २३ सप्टेंबरला नागपुरात आणि तिसरा T20 २५ सप्टेंबरला हैदराबादमध्ये खेळवला जाईल. यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळून T20 विश्वचषकाची तयारी पूर्ण करेल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका (India vs South Africa)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 २८ सप्टेंबरला त्रिवेंद्रममध्ये, दुसरा T20 गुवाहाटीमध्ये २ ऑक्टोबरला आणि तिसरा T20 ४ ऑक्टोबरला इंदूरमध्ये खेळवला जाईल. यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळणार आहे.

वनडे मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबरला लखनौमध्ये, दुसरा सामना ९ ऑक्टोबरला रांचीमध्ये आणि तिसरा सामना ११ ऑक्टोबरला दिल्लीत खेळवला जाईल.

आफ्रिकेविरुद्धची २०२० मधील रिशेड्युल वनडे मालिका-

ही तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २०२० मध्ये आयोजिक केली होती. मात्र, ती कोरोनामुळे रद्द करावी लागली होती. त्यामुळे आता ही मालिका यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेचे वेळापत्रक-

पहिला T20 - २० सप्टेंबर (मोहाली)

दुसरा T20I - २३ सप्टेंबर (नागपूर)

तिसरा टी-20 -२५ सप्टेंबर (हैदराबाद)

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 मालिका-

पहिला T20I - २८ सप्टेंबर (त्रिवेंद्रम)

दुसरा T20I - २ ऑक्टोबर (गुवाहाटी)

तिसरा T20I - ४ ऑक्टोबर (इंदूर)

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका-

पहिला वनडे- ६ ऑक्टोबर (लखनौ)

दुसरा वनडे- ९ ऑक्टोबर (रांची)

तिसरा वनडे- ११ ऑक्टोबर (दिल्ली)

WhatsApp channel