मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 World cup 2022 Super 12: सुपर १२ फेरीचं चित्र स्पष्ट, भारताच्या गटात ‘या’ दोन संघांची एन्ट्री

T20 World cup 2022 Super 12: सुपर १२ फेरीचं चित्र स्पष्ट, भारताच्या गटात ‘या’ दोन संघांची एन्ट्री

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 21, 2022 05:18 PM IST

T20 World cup 2022 Super 12 Full Schedule: टी-20 विश्वचषकातील १२ वा सामना स्कॉटलंड आणि झिम्बाब्वे यांच्यात रंगला. ब गटातील या सामन्यात दोन्ही संघ होबार्टमध्ये आमनेसामने आले. झिम्बाब्वेने हा सामना ५ गडी राखून जिंकून सुपर-१२ मध्ये आपले स्थान पक्के केले आहे.

T20 World cup 2022 Super 12
T20 World cup 2022 Super 12

Scotland vs Zimbabwe highlights: झिम्बाब्वेने पहिल्या फेरीत ब गटातील शेवटच्या सामन्यात स्कॉटलंडचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयासह झिम्बाब्वेने सुपर-१२ मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. झिम्बाब्वे ब गटात अव्वल स्थानी राहून सुपर-१२ मधील गट-२ मध्ये पोहोचला आहे. गट २ मध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडचे संघ आहेत. आजच्या पराभवानंतर स्कॉटलंड स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

तर ग्रुप-बी मधून आयर्लंडचा संघ सुपर-१२ मधील ग्रुप-१ मध्ये पोहोचला आहे. ग्रुप २ मध्ये आयर्लंडसह इंग्लंड, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि गतविजेते ऑस्ट्रेलियाचे संघ आहेत.

ग्रुप १- इंग्लंड, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड

ग्रुप २- भारत, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नेदरलँड

T20 विश्वचषकात टीम इंडियाचे सामने (भारतीय वेळेनुसार)

 तारिख विरोधी संघ ठिकाण वेळ (भारतीय)
 २३ ऑक्टोबर पाकिस्तान मेलबर्न दुपारी १:३० वाजता
 २७ ऑक्टोबर नेदरलँड सिडनी दुपारी १२: ३० वाजता
 ३० ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका पर्थ सायंकाळी ४:३० वाजता
 २ नोव्हेंबर बांगलादेश अॅडिलेड दुपारी १:३० वाजता
 ६ नोव्हेंबर झिम्बाब्वे मेलबर्न दुपारी १:३० वाजता

 

झिम्बाब्वेकडून स्कॉटलंडचा पराभव

दरम्यान, पात्रता फेरीतील निर्णायक सामन्यात स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २० षटकात ६ गडी बाद १३२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेच्या संघाने १८.३ षटकांत पाच गडी गमावून १३३ धावा करून सामना जिंकला. झिम्बाब्वेकडून कर्णधार क्रेग आयर्विनने सर्वाधिक ५८ धावा केल्या. तर सिकंदर रझाने ४० धावा केल्या.

सुपर-१२ मध्ये आता झिम्बाब्वेचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होबार्ट येथे होणार आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या