मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Suryakumar Yadav : सुर्या नागपूर कसोटीत खेळणार? इन्स्टा स्टोरीतून झाला खुलासा

Suryakumar Yadav : सुर्या नागपूर कसोटीत खेळणार? इन्स्टा स्टोरीतून झाला खुलासा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 04, 2023 11:39 AM IST

suryakumar yadav india vs australia test series : नागपूर कसोटी सामन्यातून श्रेयस अय्यर बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी मधल्या फळीत सूर्यकुमार यादव खेळण्याची शक्यता आहे. सुर्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून तसे संकेत दिले आहेत.

Suryakumar Yadav ind vs aus test series
Suryakumar Yadav ind vs aus test series

border gavaskar trophy 2023 test series : भारताने टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा २-१ असा पराभव केला. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी जवळपास दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. भारतीय संघाचे खेळाडू नागपुरात पोहोचले आहेत.

या मालिकेपूर्वीच स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या नागपूर कसोटीतून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी सूर्यकुमार यादवची संघात निवड करण्यात आली आहे. सोबतच सुर्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

खरं तर, श्रेयस अय्यर त्याच्या पाठीच्या दुखण्यातून अद्याप पूर्णपणे फिट झालेला नाही आणि त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी अजून २ आठवडे लागतील. अशा परिस्थितीत त्याच्या जागी पहिल्या कसोटी सामन्यात सूर्यकुमार यादवला मधल्या फळीत खेळवण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंट घेऊ शकते.

दरम्यान, सूर्यकुमार यादवने एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीवरून त्याचे चाहते अंदाज लावत आहेत. काही जणांना असे वाटत आहे की, सुर्याचे कसोटी पदार्पण होणार आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धमाकेदार फलंदाजी करून आपला ठसा उमटवणाऱ्या सूर्यकुमारने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लाल चेंडूचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, “हॅलो फ्रेंड.... या पोस्टनंतर चाहत्यांचा असा अंदाज आहे की तो कसोटीत पदार्पण करेल.

Suryakumar Yadav instagram story
Suryakumar Yadav instagram story

सुर्या शानदार फॉर्मात

सुर्याने टी-२० मध्ये शानदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षभरात त्याच्या फलंदाजीची प्रचंड चर्चा झाली आहे. यानंतर अनेक क्रिकेट तज्ञ आणि माजी क्रिकेटपटू त्याला टेस्ट फॉरमॅटमध्येही खेळवण्याचा सल्ला देताना दिसत आहेत.

दरम्यान, या रणजी मोसमात सूर्यकुमार यादवला २ सामने खेळण्याची संधी मिळाली ज्यात त्याने ३ डावात ७४.३३ च्या सरासरीने एकूण २३३ धावा केल्या. त्याच वेळी, सूर्याने ७९ प्रथम श्रेणी सामने खेळले असून, ५५४९ धावा केल्या आहेत, ज्यात १४ शतकांचा समावेश आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या