मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sunil Gavaskar: श्रीलंकेने सर्वांच्या तोंडात मारले, 'भारत-पाक फायनल' चर्चेवर गावस्करांची प्रतिक्रिया

Sunil Gavaskar: श्रीलंकेने सर्वांच्या तोंडात मारले, 'भारत-पाक फायनल' चर्चेवर गावस्करांची प्रतिक्रिया

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 13, 2022 12:33 PM IST

Sunil Gavaskar on india vs pakistan cricket: ‘ज्या लोकांनी श्रीलंकेकडे फारसे लक्ष दिले नाही. जे लोक भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल होईल असे म्हणत होते. त्या सर्व लोकांन श्रीलंकेने सणसणीत चपराक लगावली आहे’, असे माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे.

Sunil Gavaskar
Sunil Gavaskar

आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेची कामगिरी फारशी खास नव्हती. विशेष म्हणजे, श्रीलंकेचा संघ विजेतेपदाचा दावेदारही मानला जात नव्हता. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त अफगाणिस्तानला या स्पर्धेच्या जेतेपदाचे दावेदार मानले जात होते. त्यामुळे या स्पर्धेदरम्यान चाहते आणि दिग्गज क्रिकेटपटू श्रीलंका संघाकडे दुर्लक्ष करत होते.

‘ज्या लोकांनी श्रीलंकेकडे फारसे लक्ष दिले नाही. जे लोक भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल होईल असे म्हणत होते. त्या सर्व लोकांन श्रीलंकेने सणसणीत चपराक लगावली आहे’, असे माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे.

एका कार्यक्रमात बोलताना गावस्कर म्हणाले की, “आशिया कपमध्ये लोक फक्त भारत आणि पाकिस्तान संघाबद्दल बोलत होते. त्यामुळे या स्पर्धेत केवळ हे दोन संघच खेळत असल्याचे वाटत होते. पण श्रीलंकेच्या खेळाडूंनीही आपली उपस्थिती नोंदवून त्या सर्व लोकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे”.

श्रीलंकेला कमी लेखता येणार नाही

गावस्कर पुढे म्हणाले, 'आशिया कपमध्ये प्रत्येकजण भारत-पाकिस्तान, भारत-पाकिस्तान आणि फक्त भारत-पाकिस्तानबद्दलच बोलत होता. पण श्रींलकेने आपल्या खेळाडून सर्वांना दाखवून दिले की, त्यांना कमी लेखून अथवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. सोबतच, श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया चषक जिंकला आहे, याची आठवणही गावस्करांनी करुन दिली.

तसेच, जे लोक म्हणत होते की, आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होईल, त्यांना श्रीलंकेच्या संघाने जोरदार कानाखाली लगावली असल्याचेही गावस्कर म्हणाले.

अंतिम सामन्यात श्रीलंकेची शानदार कामगिरी

दरम्यान, अंतिम सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १७० धावा केल्या होत्या. भानुका राजपक्षेने सर्वाधिक ७१ आणि वनिंदू हसरंगाने ३६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ १४७ धावाच करू शकला. मोहम्मद रिझवानने ५५ आणि इप्तीखार अहमदने ३२ धावा केल्या. श्रीलंकेकडून प्रमोद मदुशनने ४ आणि वनिंदू हसरंगाने ३ बळी घेतले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या