मराठी बातम्या  /  क्रीडा  /  SA T20 League: मिनी IPL चं ऑक्शन पूर्ण, जाणून घ्या T20 लीगमधील सर्व संघांबद्दल

SA T20 League: मिनी IPL चं ऑक्शन पूर्ण, जाणून घ्या T20 लीगमधील सर्व संघांबद्दल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 20, 2022 12:29 PM IST

SA T20 League Auction: दक्षिण आफ्रिका टी-20 लीगच्या नियमांनुसार, प्रत्येक संघात जास्तीत जास्त १७ खेळाडू असू शकतात. लीगमधील सर्वच संघ १७ खेळाडूंचा पूल बनवण्यात यशस्वी झाले आहेत. त्याचबरोबर आयपीएलच्या धर्तीवर ४ परदेशी खेळाडूंना प्लेइंग-११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. ही स्पर्धा पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणार आहे.

SA T20 League
SA T20 League

दक्षिण आफ्रिका टी-20 लीगसाठी खेळाडूंचा लिलाव सोमवारी (१९ सप्टेंबर) पूर्ण झाला. केपटाऊनमधील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा लिलाव पार पडला. यावेळी ३१८ खेळाडूंनी बोली लावण्यात आली. मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज ट्रिस्टन स्टब्स या लिलावात सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. स्टब्सला सनरायझर्स इस्टर्न केपने ९२ लाख रँड (अंदाजे ४.१४ कोटी रुपये) मध्ये विकत घेतले.

या स्पर्धेच्या पहिल्या मोसमात एकूण ६ संघ सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व संघांना IPL संघांच्या मालकांनी विकत घेतले आहे.

या लीगमधील सहा संघ

मुंबई इंडियन्स केप टाऊन (रिलायन्स)

प्रिटोरिया कॅपिटल्स (JSW)

पार्ल रॉयल्स (रॉयल्स स्पोर्ट्स ग्रुप)

डर्बन सुपर जायंट्स (RPG-संजीव गोएंका)

जोहान्सबर्ग सुपर किंग्स (इंडिया सिमेंट्स)

सनरायझर्स इस्टर्न केप ( सन ग्रुप)

लिलावातील काही मोठी नावे

रिले रोसो- प्रिटोरिया कॅपिटल्स ६९ लाख रँड (३.११ कोटी रुपये)

मार्को यानसेन- सनरायझर्स इस्टर्न केप- ६१ लाख रँडमध्ये (२.७४ कोटी रुपये)

लुंगी एनगिडी- पार्ल रॉयल्स- ३.४ मिलियन रँड (अंदाजे १.५३ कोटी)

तबरेझ शम्सी- प्रिटोरिया कॅपिटल्स- ४३ लाख रँड (अंदाजे १.९३ कोटी)

लिलावानंतर १७ सदस्यीय सर्व ६ संघ-

डर्बन सुपर जायंट्स

क्विंटन डी कॉक, प्रिनेलन सुब्रायन, जेसन होल्डर, काइल मेयर्स, रीस टोपली, ड्वेन प्रिटोरियस, हेन्रिक क्लासेन, कीमो पॉल, केशव महाराज, काइल अॅबॉट, ज्युनियर डाला, दिलशान मदुशंका, जॉन्सन चार्ल्स, मॅथ्यू ख्रिश्चन जोंकर, वियान मुल्डर, सायमन हार्मर.

जोहान्सबर्ग सुपर किंग्ज

फाफ डु प्लेसिस, गेराल्ड कोएत्झी, महिश टीक्षा, रोमॅरियो शेफर्ड, हॅरी ब्रुक, जानेमन मालन, रीझा हेंड्रिक्स, काइल व्हर्न, जॉर्ज गार्टेन, अल्झारी जोसेफ, लुईस डु प्लॉय, लुईस ग्रेगरी, लिझाड फेरे विल्यम्स , नांद्रे बर्जर, मालुसी सिबोटो, कॅलेब सेलिका.

मुंबई इंडियन्स केपटाऊन

कागिसो रबाडा, डेवाल्ड ब्रेविस, रशीद खान, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, रायन रिकेल्टन, जॉर्ज लिंडे, ब्यूरन हेंड्रिक्स, डुआन जॅन्सेन, डेलानो पोटगायटर, ग्रँट रूलोफसेन, वेस्ली मार्शल, वेस्ली मार्शल स्टोन, वकार सलामखेल, झुयद अब्राम्स, ओडियन स्मिथ.

पार्ल रॉयल्स

डेव्हिड मिलर, कॉर्बिन बॉश, जोस बटलर, ओबेद मॅककॉय, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी, जेसन रॉय, डेन विलास, ब्योर्न फॉर्च्युइन, विहान ल्यूब, फेरीस्को अॅडम्स, इम्रान मॅनॅक, इव्हान जोन्स, रॅमन सिमंड्स, मिचेल व्हॅन बुरेन, इऑन मॉर्गन, कोडी जोसेफ.

प्रिटोरिया कॅपिटल्स

एनरिक नॉर्खिया, मिगुएल प्रिटोरियस, रिले रोसो, फिल सॉल्ट, वेन पारनेल, जोश लिटल, शॉन वॉन बर्ग, आदिल रशीद, कॅमेरॉन डेलपोर्ट, विल जॅक, थ्युनिस डी ब्रुयन, मार्को मारेस, कुसल मेंडिस, डॅरिन डुपाव्हिलॉन, जिमी नीशम, एथन बॉश, शेन डॅड्सवेल.

सनरायझर्स इस्टर्न केप

एडन मार्कराम, ओटनील बार्टमन, मार्को जॅन्सन, ट्रिस्टन स्टब्स, सिसांडा मॅगाला, जुनैद दाऊद, मेसन क्रेन, जॉन-जॉन स्मट्स, जॉर्डन कॉक्स, अॅडम रॉसिंग्टन, रोएलॉफ वेन-डर मर्व्ह, मार्कस अकरमन, जेम्स फुलर , टॉम एबेल, अया गकामाने, सेर्ले एरवी, ब्रायडन कार्स.

WhatsApp channel

संबंधित बातम्या