मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Jasprit Bumrah : शोएबकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं, पण आता तसंच घडतंय, बुमराह जास्त खेळू शकणार नाही!

Jasprit Bumrah : शोएबकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं, पण आता तसंच घडतंय, बुमराह जास्त खेळू शकणार नाही!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 27, 2023 01:31 PM IST

shoaib akhtar on jasprit bumrah bowling action : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा फिटनेस हा सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय आहे, ज्यामध्ये तो आता आगामी आयपीएल २०२३च्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

Jasprit Bumrah injury
Jasprit Bumrah injury

shoaib akhtar on jasprit bumrah bowling action : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आगामी इंडियन प्रीमियर लीगमधूनही (IPL 2023) बाहेर पडला आहे. याशिवाय जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम सामन्यातही त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.

खरे तर मागच्या वर्षी जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानाबाहेर जावे लागले होते. ज्यावेळी त्याला ही समस्या आली होती, तेव्हा तो इतके दिवस संघाबाहेर राहील, असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र, आता त्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण क्रिकेट विश्व हैराण झाले आहे. बुमराहच्या दुखापतीचे सर्वात मोठं कारण त्याची बॉलिंग अॅक्शन असल्याचे मानले जात आहे. बुमराहला अशी दुखापत होईल याचा अंदाज पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने फार पूर्वीच वर्तविला होता.

शोएब अख्तरचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शोएब अख्तर बुमराहची अनोखी बॉलिंग अॅक्शन त्याच्या कारकिर्दीला कशी धोका निर्माण करू शकते याबद्दल बोलत आहे.

बुमराहची गोलंदाजी फ्रंटल अॅक्शनवर आधारित

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनवरील चर्चेदरम्यान शोएबने सांगितले होते की, त्याची गोलंदाजी फ्रंटल अॅक्शनवर अवलंबून असते. अशा प्रकारची अ‍ॅक्शन असलेले गोलंदाज त्यांच्या पाठीच्या आणि खांद्याच्या साह्याने गोलंदाजीचा वेग वाढवतात. एकदा का या प्रकारची बॉलिंग ऍक्शन असलेल्या गोलंदाजांना पाठीच्या दुखापतीची समस्या उद्भवली की ते कायम त्यांच्यासोबत राहते. शोएबने यावेळी वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप आणि न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँड यांचे उदाहरण दिले. या दोघांचही गोलंदाजी अॅक्शन फ्रंटल होती.

Jasprit Bumrah injury
Jasprit Bumrah injury

बुमराह सर्व फॉरमॅट खेळू शकणार नाही, मॅनेजमेंटची गरज

त्यावेळी अख्तरने असाही इशारा दिला होता की, जसप्रीत बुमराहने वर्कलोड मॅनेज करणे खूप गरजेचे आहे नाही तर येत्या १ ते २ वर्षात तो संपुष्टात येईल.

शोएब म्हणाला की, बुमराहला आता विचार करायला हवा. कारण तो सर्व फॉरमॅट आता खेळू शकणार नाही. त्याला मॅनेजमेंटची गरज आहे. जर तुम्ही बुमराह प्रत्येक सामन्यात खेळवले तर एका वर्षात तो पूर्णपणे तुटून जाईल. त्याला ५ पैकी ३ खेळवा आणि मग त्याला थोडीशी विश्रांती द्या. बुमराहला जास्त दिवस खेळवायचे असेल तर वर्लकलोड सांभाळावे लागेल".

जसप्रीत बुमराहला २०१९ पासून दुखापतीचे ग्रहण

जसप्रीत बुमराहच्या आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्याने पहिल्या १ ते २ वर्षात उत्तम खेळ दाखवला आणि तो पूर्णपणे तंदुरुस्तही राहिला. त्यानंतर २०१९ मध्ये त्याच्या फिटनेसबाबत अनेक समस्या समोर येऊ लागल्या. यानंतर जेव्हा स्ट्रेस फ्रॅक्चरची समस्या समोर आली तेव्हा तो आतापर्यंत तीनदा या समस्येशी झुंजताना दिसला आहे. सध्या जसप्रीत बुमराह राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या फिटनेसवर काम करत आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या