Shaheen Afridi Wedding : शाहीन आफ्रिदी विवाहबंधनात, बाबरसह या क्रिकेटपटूंची 'निकाह'ला हजेरी
shaheen afridi wedding : पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू शाहीन आफ्रिदीने माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या मुलीशी लग्न केले आहे. शाहीनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shaheen Afridi Ansha Afridi Nikah : पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी शुक्रवारी (३ फेब्रुवारी) विवाहबंधनात अडकला. माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशासोबत त्याचे लग्न झाले आहे. शाहीनच्या लग्नात त्याच्या जवळच्या मित्रांसह टीमचे खेळाडूही उपस्थित होते. शाहीनच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यानंतर सर्व स्तरातून शाहीनचे अभिनंदन होत आहे.
ट्रेंडिंग न्यूज
या दोघांच्या लग्नाची चर्चा खूप दिवसांपासून सुरू होती. शाहीनने कराचीत कुटुंबियांच्या उपस्थितीत मुस्लिम रितीरिवाजांनी लग्न केले. पाकिस्तानच्या जिओ न्यूजनुसार, शाहीन आणि अंशाचा मेहंदी सेरेमनी गुरुवारी रात्री पार पडला. यानंतर दोघांनी शुक्रवारी कराचीमध्ये लग्न केले.
शाहीन आपल्या कामगिरीमुळे खूप चर्चेत असतो. त्याने अनेक मोठ्या प्रसंगी संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. शाहीन आफ्रिदीच्या लग्नात त्याच्या जवळच्या मित्रांसह पाकिस्तान क्रिकेट संघाचे खेळाडूही उपस्थित होते. शाहीनच्या लग्नानंतर बाबर आझमने त्याला मिठी मारून शुभेच्छा दिल्या. याचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. शाहीन आणि बाबरच्या चाहत्यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाकिस्तानचे सोशल मीडिया यूजर्स शाहीनच्या लग्नाचे अनेक फोटो शेअर करत आहेत.