मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Guru Purnima 2022: ‘मी नशिबवान मला तीन गुरु लाभले,’ सचिनने केलं गुरूंचे स्मरण

Guru Purnima 2022: ‘मी नशिबवान मला तीन गुरु लाभले,’ सचिनने केलं गुरूंचे स्मरण

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 13, 2022 01:53 PM IST

गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आपल्या गुरु, शिक्षक आणि ज्येष्ठांचे स्मरण करतात आणि त्यांची पूजा करतात. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सचिनसह अनेक क्रिकेटपटूंनी आज आपल्या गुरूंचे स्मरण केले आहे.

sachin
sachin

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सचिन तेंडुलकरने बुधवारी एक ट्वीट केले आहे. या माध्यमातून सचिनने आपल्या गुरूंना वंदन केले व त्यांचे आभार मानले आहे.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आपल्या गुरु, शिक्षक आणि ज्येष्ठांचे स्मरण करतात आणि त्यांची पूजा करतात. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सचिनसह अनेक क्रिकेटपटूंनी आज आपल्या गुरूंचे स्मरण केले आहे.

या ट्वीटमध्ये सचिन म्हणाला, 'मी खूप भाग्यवान आहे, मला एक नाही तर तीन गुरु लाभले. माझे वडील, आचरेकर सर आणि माझा भाऊ अजित मला या तीन लोकांचे आभार मानायचे आहेत, ज्यांच्यामुळे मी या टप्प्यावर पोहोचलो. त्यांनी मला फक्त क्रिकेटच नाही तर एक चांगला माणूस बनायलाही शिकवलं आहे". दरम्यान, सचिनचा भाऊ अजित यांनीच सर्वप्रथम सचिनला रमाकांत आचरेकर यांच्या कडे नेले होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी १०० शतके झळकावणाऱ्या सचिनच्या यशस्वी करिअरचे बरेचसे श्रेय हे त्याचे बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनाही जाते. आचरेकर यांनी मुंबईच्या शिवाजी पार्कवर सचिनला फलंदाजीमधल्या टीप्स दिल्या. त्यानंतर सचिनने भारतीय क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

काही वर्षांपूर्वी सचिनने आचरेकर सरांनी सचिनला कसे घडवले हे सांगितले होते. सचिन जेव्हा बॅटिंगा यायचा, तेव्हा आचरेकर सर मिडल स्टंपवर एक रुपयाचे नाणे ठेवायचे आणि गोलंदाजांना चॅलेंज द्यायचे. जो बॉलर सचिनची विकेट घेईल, त्यांना ते नाणे बक्षीस मिळेल. तसेच, जर सचिनची विकेट कुणीच घेऊ शकले नाही तर तो एक रुपया सचिनला मिळणार.

आचरेकर सरांच्या या युक्तीमुळे सचिनचा आत्मविश्वास आणि टेक्निक तर बळकट झालीच, शिवाय याचा फायदा सचिनला कसोटी क्रिकेटमध्ये झाला. या युक्तीमुळेच सचिन कसोटीत दिवस-दिवस बॅटिंग करु शकला.

WhatsApp channel