Ruturaj Gaikwad Wedding : ऋतुराज गायकवाडच्या नव्या इनिंगला सुरुवात, महाबळेश्वरमध्ये उत्कर्षासोबत 'शुभमंगल'!-ruturaj gaikwad marriage utkarsha pawar photo video viral dhoni teammate ruturaj marriage with utkarsha after ipl 2023 ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ruturaj Gaikwad Wedding : ऋतुराज गायकवाडच्या नव्या इनिंगला सुरुवात, महाबळेश्वरमध्ये उत्कर्षासोबत 'शुभमंगल'!

Ruturaj Gaikwad Wedding : ऋतुराज गायकवाडच्या नव्या इनिंगला सुरुवात, महाबळेश्वरमध्ये उत्कर्षासोबत 'शुभमंगल'!

Jun 04, 2023 10:20 AM IST

Ruturaj Gaikwad Marriage Utkarsha Pawar : चेन्नई सुपर किंग्जचा स्टार सलामीवीर ऋतुराज गायकवाड लग्नगाठीत अडकला आहे. ऋतुराजने आज (३ जून) महिला क्रिकेटपटू उत्कर्षा पवार हिच्याशी लग्न केले आहे.

Ruturaj Gaikwad Utkarsha Pawar wedding
Ruturaj Gaikwad Utkarsha Pawar wedding

Ruturaj Gaikwad Utkarsha Pawar wedding : IPL 2023 च्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जला (CSK) चॅम्पियन बनवणारा स्टार सलामीवीर ऋतुराज गायकवाड लग्नगाठीत अडकला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाचव्यांदा जेतेपद पटकावले. ऋतुराजने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

यानंतर आज (३ जून) ऋतुराज गायकवाडने महिला क्रिकेटरशी लग्न केले आहे. उत्कर्षा पवार असे वधूचे नाव असून दोघेही आयपीएल फायनलनंतर एकत्र दिसले होते. आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर उत्कर्षाने महेंद्रसिंग धोनीचे पाय स्पर्श करून आशीर्वादही घेतला होता. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. ऋतुराज आणि उत्कर्षा यांचा विवाहसोहळा महाबळेश्वर येथील आलिशान 'ले मेरिडियन रिसॉर्ट अँड स्पा'मध्ये पार पडला.

या आठवड्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी ऋतुराज गायकवाडची भारतीय टीममध्ये निवड झाली होती, मात्र त्याने लग्नासाठी ब्रेक घेतला. ऋतुराज टीम इंडियाच्या राखीव यादीत होता. ऋतुराजने स्वतः इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर करून लग्नाची माहिती दिली आहे.

उत्कर्षाने महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळलं आहे

२४ वर्षीय उत्कर्षा पवार पुण्याची असून महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळते. ती मीडियम पेसर गोलंदाज आहे. उत्कर्षा २०२१ मध्ये महाराष्ट्राकडून लिस्ट A क्रिकेट खेळली आहे, पण त्यानंतर तिला संधी मिळाली नाही. सोबतच उत्कर्षाने इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशन अॅण्ड फिटनेस साइंसेस शिक्षण घेतलं आहे. ऋतुराजसोबत लग्न होणार असल्याच्या बातमन्या आल्यापासून ती खूप ट्रेंडमध्ये आहेत.

उत्कर्षा-ऋतुराजने मिळून आयपीएल ट्रॉफी उचलली

आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव केला. जेतेपद पटकावल्यानंतर उत्कर्षा आणि ऋतुराजने आयपीएल ट्रॉफीसोबत फोटोसेशन केले होते. तेव्हापासून दोघांचे फोटो खूप व्हायरल होत आहेत आणि दोघेही ट्रेंडमध्ये आहेत. दरम्यान नुकताच एक व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये उत्कर्षा धोनीच्या पायांना स्पर्श करताना दिसत आहे.

Whats_app_banner