मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MS Dhoni: 'गेल्या १५ वर्षांत 'हा' विकेटकीपर बेस्ट; धोनीचं फक्त नाव मोठं', माजी कॅप्टनचा दावा

MS Dhoni: 'गेल्या १५ वर्षांत 'हा' विकेटकीपर बेस्ट; धोनीचं फक्त नाव मोठं', माजी कॅप्टनचा दावा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 10, 2022 10:22 PM IST

Rashid Latif on MS Dhoni: धोनी हा आतापर्यंतचा सर्वोत्तम यष्टिरक्षक म्हणून ओळखला जातो. तो अजूनही इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. धोनी संघाचा कर्णधारही आहे.

MS Dhoni
MS Dhoni

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या यष्टीरक्षणाचे आजही जगभरातील लोक कौतुक करतात. धोनीपेक्षा वेगवान विकेटकीपर कोणी नाही, असे म्हटले जाते. धोनी १५ ऑगस्ट २०२० रोजी निवृत्त झाला. सध्याचा युवा यष्टिरक्षक त्याला आपला आदर्श मानतात. पण पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफला वाटते की धोनी चांगला यष्टीरक्षक नव्हता.

पाकिस्तानसाठी दीर्घकाळ यष्टीरक्षक राहिलेल्या लतीफने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “धोनीने जवळपास २१ टक्के झेल सोडले आहेत. हा एक मोठा आकडा आहे. धोनीने सोडलेल्या संधींबाबतही चर्चा व्हायला हवी, असे रशीदचे मत आहे”. 

धोनीचा रेकॉर्ड पाहता त्याने कसोटीत २५६ झेल घेतले आणि ३८ स्टंपिंग केले आहेत. वनडेमध्ये ३२१ झेल आणि १२३  स्टंपिंग आहेत. त्याच वेळी, टी-20 मध्ये धोनीने ५७ झेल घेतले आणि ३४ स्टंम्पिंग केल्या आहेत.

राशिद पुढे म्हणाला की, “धोनी एक फलंदाज-विकेटकीपर होता. तो मोठा आहे, पण जर मी आकडेवारीबद्दल बोललो तर त्याचे झेल सोडण्याचे प्रमाण २१ टक्के आहे. प्रत्येकजण त्याच्या झेलांबद्दल बोलतो, परंतु सोडलेल्या झेलबद्दल कोणीही बोलत नाही. त्याने किती स्टंपिंग सोडले, किती बायचे रन दिले आणि रनआउटच्या किती संधी त्याने गमावल्या. सर्व जोडल्यानंतर तुम्हाला संपूर्ण चित्र दिसेल”.

धोनी हा आतापर्यंतचा सर्वोत्तम यष्टिरक्षक म्हणून ओळखला जातो. तो अजूनही चेन्नई सुपर किंग्जकडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतो. धोनी त्या संघाचा कर्णधारही आहे.

दरम्यान, सर्वोत्तम यष्टिरक्षक कोण असे राशिद लतीफला विचारले असता, त्याने दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकचे नाव घेतले. तथापि, तो म्हणाला की डिकॉकमध्ये फिनिशिंग क्षमतांचा अभाव आहे. लतीफने डी कॉकला गेल्या १५ वर्षांतील सर्वोत्तम यष्टिरक्षक म्हटले आहे.

WhatsApp channel